२७ मार्च पासून ४ एप्रिलपर्यंत बँका राहणार बंद; लवकरात लवकर उरकून घ्या महत्त्वाची कामे, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

२७ मार्च आणि २९ मार्च रोजी लागोपाठ तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) राहतील. २७ मार्च २०२१ ला महिन्याचा चौथा शनिवार आहे. २८ मार्च २०२१ ला रविवार आहे. म्हणून या दोन तारखांना देशातल्या सर्व राज्यातील बँका बंद राहतील. २९ मार्च २०२१ ला होळी असल्याने बँका बंद राहतील.

  नवी दिल्ली : जर तुम्हाला बँकेशी (Bank) संबंधित काही कामे करायची असतील तर ती याच आठवड्यात करावीच लागतील. नाहीतर ३ एप्रिलपर्यंत तुम्हाला वाट पाहायला लागू शकते, यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. कोरोना व्हायरस (Corona virus pandemic) महामारी लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरक्षित सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून आपली बँकेची कामे करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जर तुम्हाला ब्रँचमध्ये काही काम असल्यास तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण २७ मार्च पासून ते ४ एप्रिल २०२१ दरम्यान फक्त दोनच दिवस बँका सुरू राहणार आहेत.

  तीन दिवस बंद राहणार बँका

  २७ मार्च आणि २९ मार्च रोजी लागोपाठ तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) राहतील. २७ मार्च २०२१ ला महिन्याचा चौथा शनिवार आहे. २८ मार्च २०२१ ला रविवार आहे. म्हणून या दोन तारखांना देशातल्या सर्व राज्यातील बँका बंद राहतील. २९ मार्च २०२१ ला होळी असल्याने बँका बंद राहतील.

  भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या बेवसाइट नुसार पाटण्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत.पाटण्यात ३० मार्चला आपली कामे करण्यासाठी तुमहाला बँकेत जाता येणार नाही. ३१ मार्चला सुट्टी नाही पण या दिवशी ग्राहकांना बँकेकडून सेवा देण्यात येत नाहीत कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. बँकांसाठी आपले वार्षिक खाते बंद करण्यासाठी १ एप्रिलचा दिवस निश्चित आहे, म्हणून या दिवशीही ग्राहकांना सेवा मिळणार नाही. या नंतर २ एप्रिलला गुड फ्रायडे आहे, म्हणून देशभरातील बँका बंद राहतील अशातच बँकेची काही कामे अपूर्ण राहिली असतील तर पुढल्या आठवड्याच्या सुरूवातीलाच ती उरकून घ्या.

  • २७ मार्च २०२१- महिन्याचा चौथा शनिवार
  • २८ मार्च २०२१- रविवार
  • २९ मार्च २०२१- होळी
  • ३० मार्च २०२१- पाटना ब्रांचला सुट्टी, अन्य दिवशी बँका खुल्या राहतील
  • ३१ मार्च २०२१- वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवसाची सुट्टी
  • १ एप्रिल २०२१- वार्षिक खाते बंद करण्याचा दिवस
  • २ एप्रिल २०२१- गुड फ्रायडे
  • ३ एप्रिल २०२१- सर्व बँका सुरू राहतील
  • ४ एप्रिल २०२१- रविवार

  या सर्व सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यात असणाऱ्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी RBI च्या वेबसाइटला भेट द्या.