Bank holidays for 14 days in the month of January 2021 nrvb
Alert ! जानेवारी महिन्यात तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद, महत्त्वाची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; वाचा संपूर्ण माहिती

जानेवारी महिन्यात देशातल्या बँकांना तब्बल १४ दिवस सुट्ट्या (bank holidays) असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) जानेवारी महिन्यातल्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार जानेवारीमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत असे असले तरी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांचे स्वरुप वेगळे असणार आहे.

मुंबई : नव्या वर्षाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झालेले आहेत. या वर्षात अनेकांनी नवनवे संकल्पही केले असतील. तसेच, आगामी महिन्यात काय काय कामे करायची आहेत, याची यादी देखील तुम्ही केलेली असेल. मात्र, येणाऱ्या नव्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात तुमचे बँकेत काही महत्तावाचे काम असेल तर तुम्ही सतर्क असायलाच हवं. कारण जानेवारी महिन्यात देशातली बँकांना तब्बल १४ दिवस सुट्या (bank holidays) असणार आहेत. म्हणजेच जवळपास अर्धा महिना देशातील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेची सगळी कामे आटोपण्याच्या दिशेने पावलं टाकायला हवीत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) जानेवारी महिन्यातल्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार जानेवारीमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत असे असले तरी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांचे स्वरुप वेगळे असणार आहे. तेथील स्थानिक सण, उत्सवानुसार सुट्यांच्या संख्येत बदल होऊ शकतो. मात्र, आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्ट्या या बहुतांश राज्यांमध्ये सारख्याच आहेत. त्यामध्ये फारसा फरक नाही.

दोन प्रकारच्या असणार सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार देशातील बँका बंद असतात. या सुट्या दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या प्रकारात महिन्याच्या प्रत्येक रविवारी आणि दुसऱ्या शनिवारी बँकेला सुट्टी असेल. तर सुट्ट्यांच्या दुसऱ्या प्रकारात राज्यातील स्थानिक सण आणि उत्सवानुसार त्या असणार आहेत.

या दिवशी देशातील सर्व बँका राहणार बंद

१ जानेवारी : नव्या वर्षाची सुट्टी
३ जानेवारी : रविवार
९ जानेवारी : दुसरा शनिवार
१० जानेवारी : रविवार
१७ जानेवारी : रविवार
२३ जनवरी: चौथा शनिवार
२४ जानेवारी : रविवार
२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन
३१ जानेवारी : रविवार