कामे वेळेतच उरकायला हवी होती पण आता सणांमुळे बँका सोमवार ते पुढचा शनिवार एकूण ९ दिवस राहणार बंद ; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

शनिवारपासून काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुम्ही त्यांच्या सुट्टींबाबत जाणून घ्यायला पाहिजे. दुसरी शनिवार असल्याने १० जुलैला सुट्टी होती. तर रविवार असल्याने ११ आणि १८ जुलै रोजी बँका बंद राहणार आहे.

  नवी दिल्ली : बँकेशी संबंधित आपल्याला काही काम करायचे असेल, बराच वेळ वाट पाहावी लागते. कधी कधी तर एक काम करण्यासाठी दोन-दोन दिवसही लागतात. आता बँका जुलै महिन्यात १५ दिवस बंद राहणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर बँकेतील काम करणे गरजेचे आहे.

  शनिवारपासून काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुम्ही त्यांच्या सुट्टींबाबत जाणून घ्यायला पाहिजे. दुसरी शनिवार असल्याने १० जुलैला सुट्टी होती. तर रविवार असल्याने ११ आणि १८ जुलै रोजी बँका बंद राहणार आहेत.

  तसेच बँका सोमवार ते पुढच्या शनिवारी एकूण ९ दिवस बंद राहतील. १५ जुलैला सुट्टी नाही. या बँकेचा सुट्टीचा निर्णय वेगवेगळ्या राज्यांनुसार घेतला जातो. ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या निश्तिच करण्यात आल्या आहे. त्याच राज्यांमध्ये बँक काम करणार नाहीये.

  जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल:

  ११ जुलै २०२१ रविवार
  १२ जुलै २०२१ सोमवार- कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)
  १३ जुलै २०२१ मंगळवार भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू-काश्मीर, सिक्कीम)
  १४ जुलै २०२१ द्रपका त्शेची (गंगटोक)
  १६ जुलै २०२१ गुरुवार हरेला पूजा (देहरादून)
  १७ जुलै २०२१ खारची पूजा (अगरताळा, शिलाँग)
  १८ जुलै २०२१ रविवार
  १९ जुलै २०२१ गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (गंगटोक)
  २० जुलै २०२१ मंगळवार ईद अल अधा (देशभर)
  २१ जुलै २०२१ बुधवार बकरी ईद (देशभर)

  bank holidays in july 21 know the details