प. बंगालमध्ये आता शनिवारीही Banks सुरू राहणार, राज्यात लागू होणार का हा निर्णय?

पश्चिम बंगाल सरकारने येथील जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीत कोणालाही आर्थिक चणचण भासू नये म्हणून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: कोरोना महामारी (covid -19) मुळे सर्व जगातच भयंकर परिस्थिती आहे. त्यातच अनेकांनी आपल्या उदरनिर्वाहाची साधनेही (jobs) गमावाली आहेत. जो तो आपापल्या परीने संसाराचा गाडा रेटण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे असलेल्या शिलकीतून (bank balance) तो आपल्या संसाराला हातभार लावताना दिसतो आहे. अशातच पश्चिम बंगाल सरकारने (west bengal government) येथील जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीत कोणालाही आर्थिक चणचण (fiancial problems) भासू नये म्हणून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या (second) आणि चौथ्या (fourth) शनिवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआयने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सरकारी नियमांनुसार बँकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पण कोरोना महामारीसारख्या कठीण प्रसंगात कोणालाही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ज्यांना शनिवारी पैशांची चिंता जाणवत होती किंवा ज्यांना या दिवशी पैशांचे मोठे व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या त्यांचा हा प्रश्न पश्चिम बंगाल सरकारने तूर्तास तरी निकाली काढला आहे.

महाराष्ट्रातही बँकांना सुट्ट्यांचा हाच नियम लागू आहे. पश्चिम बंगाल सरकारने दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जसा तेथील लोकांना दिलासा मिळाला आहे असाच दिलासा महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार देणार का? याकडे आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.