BharatPe became the top company to provide fintech loans to traders during the corona virus period
जागतिक साथी दरम्यान व्यापाऱ्यांसाठी फिनटेक कर्ज देणारी भारत पे ठरली सर्वोच्च कंपनी

भारत पे या भारताच्या सर्वांत मोठ्या मर्चंट पेमेंट नेटवर्कने आज घोषणा केली की, त्यांनी सप्टेंबर २०२० मध्ये ८० कोटी रूपयांपेक्षा अधिक कर्ज वितरणाचा विक्रम केला असून या जागतिक साथीदरम्यान भारतातील व्यापाऱ्यांसाठी सर्वांत मोठी फिनटेक धनको कंपनी ठरली आहे.

  • सप्टेंबर २०२० मध्ये दिले ८० कोटी रूपयांपेक्षा अधिक कर्ज
  • आर्थिक वर्ष २१च्या शेवटापर्यंत १,००० कोटी रूपये वितरित करण्याचे लक्ष्य

मुंबई : भारत पे या भारताच्या सर्वांत मोठ्या मर्चंट पेमेंट नेटवर्कने आज घोषणा केली की, त्यांनी सप्टेंबर २०२० मध्ये ८० कोटी रूपयांपेक्षा अधिक कर्ज वितरणाचा विक्रम केला असून या जागतिक साथीदरम्यान भारतातील व्यापाऱ्यांसाठी सर्वांत मोठी फिनटेक धनको कंपनी ठरली आहे. या कंपनीने चालू तिमाहीत आपल्या भागीदारांमार्फत १५० कोटी रूपयांपर्यंत कर्ज वितरित केले आहे. भारतपेने घोषणा केली की, यावर्षी कर्ज वितरणाची संख्या ७ पटीने वाढवण्याच्या त्यांच्या योजना आहेत आणि आर्थिक वर्ष २१ च्या उर्वरित कालावधीत ते १,००० कोटी रूपयांचे कर्ज ते वितरित करतील.

इतर आर्थिक संस्थांकडून तारणमुक्त कर्ज मिळणे कठीण असताना भारतपेच्या कर्ज देण्यात आलेल्या यशाचे कारण त्यांच्या यूपीआय क्यूआर कोडद्वारे छोट्या रकमेच्या रोजच्या परतावा यंत्रणा आहे. विद्यमान व्यापाऱ्यांना कमी व्याजदरावर ७ लाख रूपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज कमीत-कमी कागदोपत्री कामाद्वारे मिळू शकते. त्याचबरोबर, कंपनीच्या नव्याने आलेल्या भारतलोन उत्पादनाला व्यापारी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. हे नवीन उत्पादन कर्जयोग्य असलेल्या व्यापाऱ्यांसाठी १०० टक्के डिजिटल आणि ऑटोमेटेड प्रक्रियेद्वारे कर्ज मिळवणे शक्य करते.

भारतलोन सोबत व्यापाऱ्यांना हायब्रिड परतावा पद्धतीचा वापर रोजच्या क्यूआर/ पीओएस कलेक्शनद्वारे आणि साप्ताहिक प्रदान बँक खात्यातून थेट करून करता येईल.

आपल्या कर्ज उद्योगाच्या यशाबाबत बोलताना भारतपेचे मुख्य महसूल अधिकारी श्री. निशित शर्मा म्हणाले की, “लघु आणि मध्यम उद्योग आता पुन्हा कार्यरत झाले आहेत आणि पुढील सणाच्या कालावधीसाठी सज्ज होत आहेत. भारतपे समोरून कर्ज देऊन व्यापारी समुदायाला कर्जाची मदत करत आहे. व्यापाराची कर्जयोग्यता तपासण्यासाठी तयार केलेली आमच्या मालकीची रचना आणि एक मल्टीमॉडेल कलेक्शन यंत्रणा या गोष्टी आमच्या कर्ज उत्पादनाच्या पाठीचा कणा आहेत.

भारतपेचे उद्दिष्ट हे भारतीय व्यापाऱ्यांसाठी एक फिनटेक भागीदार होण्याचे आहे आणि त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही नवनवीन उत्पादने बाजारात आणू.”

भारतलोनमुळे व्यापाऱ्यांना १५ महिन्यांच्या कालावधीत २०,००० रूपये ते ७ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात मिळवणे शक्य होते. व्यापारी हे कर्ज छोट्या रोजच्या किंवा साप्ताहिक हप्त्यात भरू शकतात. कंपनीच्या कर्ज उत्पादनांची सुरूवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल प्रक्रिया आहे. अर्ज करण्यापासून ते कागदपत्रे अपलोड करेपर्यंत आणि कर्ज निश्चितीपर्यंत. व्यापारी कुठेही बाहेर जाण्याचा धोका न पतत्करता भारतपेवर कर्जासाठी अर्ज करू शकतात.