सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण ; शेअर बाजारात चकाकी, जाणून घ्या आजचे दर?

एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १२४ रुपयांच्या घसरणीसह ४४७५५ रुपयांवर होता. तर, जून डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव १०७ रुपयांनी घसरून ४५०८१ रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर ट्रेड करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावावर दबाव दिसून आला आहे.

    सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी, एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १२४ रुपयांच्या घसरणीसह ४४७५५ रुपयांवर होता. तर, जून डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव १०७ रुपयांनी घसरून ४५०८१ रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर ट्रेड करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावावर दबाव दिसून आला आहे.

    चांदीच्या दरावरही आज दबाव दिसला आहे. चांदीचा भाव मे डिलीव्हरीसाठी ३१० रुपयांच्या घसरणीसह ६७२३५ रुपये प्रतिकिलो पातळीवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चांदी सध्या ०.१६ डॉलर (-0.62%) घसरणीसह प्रति औंस २६.०३ डॉलरवर व्यापार करत होती.

    दरम्यान, आज सकाळी आशियाई शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली आहे. सकाळी ९.४० वाजता सेन्सेक्स ४२२ अंकांच्या वाढीसह (+0.82%) ५१७०२ रुपयांच्याच्या पातळीवर व निफ्टी १२२ अंकांच्या तेजीसह (0.81%) वाढीसह १५२९७ वर व्यापार करत होता. सध्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, एक्झीबँक अव्वल स्थानी आहेत.

    काल(गुरूवार) स्थिती पाहिली असता, सोन्याच्या किमतीत घट झाली होती. तसेच सोन्याची किंमत १० ग्रॅमवर ४४,६८० रुपये होती. मागील वर्षी प्रति १० ग्रॅम ५७००० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा जागतिक बाजारात स्थिरता निर्माण होते. तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात.