पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबात मोठी बातमी; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची स्पष्टोक्ती

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. पेट्रोल-डिझेलचा वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीत समावेश केल्यास त्याचे दर कमी होतील, असे अर्थविश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळे इंधनाचा समावेश जीएसटी कार्यकक्षेत कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल डिझेलचा समावेश जीएसटी कार्यकक्षेत करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आणखी काही दिवस इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहे.

    दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. पेट्रोल-डिझेलचा वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीत समावेश केल्यास त्याचे दर कमी होतील, असे अर्थविश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळे इंधनाचा समावेश जीएसटी कार्यकक्षेत कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल डिझेलचा समावेश जीएसटी कार्यकक्षेत करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आणखी काही दिवस इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहे.

    सध्या तरी क्रूड पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, हवाई वाहतूक इंधन आणि नैसर्गिक गॅस जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याचा कोणताच प्रस्ताव नाही, असे निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना स्पष्ट केले.

    पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याचा कोणताही प्रस्ताव जीएसटी परिषदेकडून आलेला नाही. योग्यवेळी या प्रस्तावावर विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय असे की, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत चाललेल्या दरावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून तोडगा काढेल, असे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.