Now you will know the price of petrol in your city with one click, you have to do this work nrsj

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत पेट्रोलियम दरातही घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पाच दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात(petrol and diesel prize is low) केली आहे.

    मुंबई: गेल्या महिन्यात शंभरी गाठलेल्या पेट्रोलचे दर(petrol prize low) हळूहळू कमी होत आहेत. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत पेट्रोलियम दरातही घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पाच दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे.

    मंगळवारी पेट्रोल २२ पैसे तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झाले आहे. ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी कपात होऊ शकते असा अंदाज आहे. मंगळवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर ९० रुपये ५६ पैसे तर डिझेलचे दर ८० रुपये ८७ पैसे होते. मुंबईत पेट्रोल ९६ रुपये ९८ पैसे तर डिझेल ८७ रुपये ९६ पैसे प्रतिलिटर दराने विकले गेले.

    याआधी २४ आणि २५ मार्चला पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली होती. या दोन दिवसांमध्ये मिळून पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी स्वस्त झाले होते. दिल्ली, मुंबई शिवाय देशातील इतर शहरांमध्येही पेट्रोल डिझेलचे दर ९० रुपयांच्या वर आहेत. सर्वाधिक महाग पेट्रोल भोपाळमध्ये असून एक लिटर पेट्रोलची किंमत ९८.५८ रुपये इतकी आहे. तर डिझेलचा दर ८९ रुपये १३ पैसे प्रति लिटर इतका आहे. चेन्नई आणि पाटण्यात पेट्रोलचे दर ९२ रुपयांपेक्षा जास्त असून डिझेल ८५रुपयांपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. चंदिगढमध्ये पेट्रोल ८७ रुपये १४ पैसे प्रति लिटर असून डिझेल ८० रुपये ५७ पैसे दराने विकले जात आहे.