बिटकॉइनने गाठला 50,000 डॉलर्सचा टप्पा

बिटकॉइन आणि इथेरियम या लोकप्रिय आभासी चलनांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बिटकॉइनमध्ये 6 टक्के वाढ झाली आणि एका बिटकॉइनचा भाव 50,000 डॉलर्सवर गेला. त्याशिवाय इथेरियममध्ये 6 टक्के वाढ झाली आहे. बिटकॉइनच्या किमतीत 5.85 टक्के वाढ झाली आणि त्याचा भाव 50,179 डॉलरपर्यंत वाढला.

    मुंबई : बिटकॉइन आणि इथेरियम या लोकप्रिय आभासी चलनांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बिटकॉइनमध्ये 6 टक्के वाढ झाली आणि एका बिटकॉइनचा भाव 50,000 डॉलर्सवर गेला. त्याशिवाय इथेरियममध्ये 6 टक्के वाढ झाली आहे. बिटकॉइनच्या किमतीत 5.85 टक्के वाढ झाली आणि त्याचा भाव 50,179 डॉलरपर्यंत वाढला.

    बिटकॉइनचे एकूण बाजार मूल्य 943.55 अब्ज डॉलर इतके वाढले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात बिटकॉइनने 65,000 डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. तसेच इथेरियमच्या किमतीत 6.26 टक्क्याची वाढ झाली आहे. एका इथेरियमचा भाव 3754.84 डॉलर इतका वाढला आहे.

    इथेरियमचे बाजार भांडवल 440 अब्ज डॉलर्स इतके आहे. डोजेकॉइनचा भाव 0.30 डॉलर असून त्यात 7.93 टक्के वाढ झाली आहे. लिटेकॉइनचा 184.63 डॉलर असून त्यात 6.84 टक्के वाढ झाली आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]