Blue Dart plans to plant 111,000 trees in Kanha-Pench Wildlife Corridor, to become a Zero Emission Company.

ब्‍लू डार्ट एक्‍स्‍प्रेस लि. ही भारताची आघाडीची एक्‍स्‍प्रेस लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदाता, तसेच डॉईश पोस्‍ट डीएचएल ग्रुप (डीपीडीएचएल)चा भाग असलेली कंपनी ग्रो-ट्रीज सोबत सहयोगाने कान्‍हा-पेंच वन्‍यजीव कॉरिडॉरमध्‍ये १,११,००० वृक्षांचे रोपण करणार आहे. ब्‍लू डार्ट कॅलेंडर वर्ष २०२० मध्‍ये हे वृक्षारोपण पूर्ण करणार आहे आणि हे १,११,००० वृक्ष पूर्ण वाढ झाल्‍यानंतर* दरवर्षाला २२,२२,००० किग्रॅ कार्बनचे प्रमाण कमी करतील अशी अपेक्षा आहे.

कंपनीच्‍या ‘गो ग्रीन’ उपक्रमाचा भाग म्‍हणून वृक्षारोपण मोहिमेचा जागतिक तापमानवाढ कमी करण्‍याचा, मानवी-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याचा, स्‍थानिक वनस्‍पती व प्राण्‍यांचे संवर्धन करण्‍याचा आणि स्‍थानिक उदरनिर्वाहाला चालना देण्‍याचा मनसुबा.  ब्‍लू डार्ट एक्‍स्‍प्रेस लि. ही भारताची आघाडीची एक्‍स्‍प्रेस लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदाता, तसेच डॉईश पोस्‍ट डीएचएल ग्रुप (डीपीडीएचएल)चा भाग असलेली कंपनी ग्रो-ट्रीज सोबत सहयोगाने कान्‍हा-पेंच वन्‍यजीव कॉरिडॉरमध्‍ये १,११,००० वृक्षांचे रोपण करणार (Blue Dart plans to plant 111,000 trees ) आहे. ब्‍लू डार्ट कॅलेंडर वर्ष २०२० मध्‍ये हे वृक्षारोपण पूर्ण करणार आहे आणि हे १,११,००० वृक्ष पूर्ण वाढ झाल्‍यानंतर दरवर्षाला २२,२२,००० किग्रॅ कार्बनचे प्रमाण कमी करतील अशी अपेक्षा आहे.

करण्‍यात येणा-या वृक्षारोपणामध्‍ये वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश आहे, जसे चिंच, शिशम (उत्तर भारतीय रोझवुड), सिरस (फ्रायवुड), सागवानी लाकूड, करंज (भारतीय बीच), सीताफळ, बेअर (इंडियन प्लम), काटेश्वरी (लाल रेशीम कापूस), काशिद (यलो कॅसिया), कवठ, आवळा (भारतीय गूजबेरी). या जागेसभोवतालच्या परिसंस्थेचे रक्षण करणे, वन्यजीव अधिवासांची पुनर्बांधणी करणे आणि आदिवासी जमातींना देशातील वनक्षेत्र वाढीस मदत करणे ही वृक्षारोपण मोहिमांमागील काही उद्दीष्टे आहेत.

ब्लू डार्टने यापूर्वी कान्हा-पेंच कॉरिडॉरमध्ये २२२,००० वृक्ष लावले आहेत. कान्हा-पेंच कॉरिडॉरवर वृक्ष लागवड करण्याच्या या अनोख्या प्रकल्पामुळे या प्रदेशातील जैवविविधता पुनरुज्जीवित झाली आहे, मनुष्य-प्राण्यांचा संघर्ष कमी झाला आहे आणि दरवर्षी ७० पेक्षा जास्त कुटुंबांना थेट खड्डा खोदकाम व वृक्षारोपण कार्यात सुमारे ५,६०० कामकाजाचे दिवस उपलब्ध आहेत. महामारीच्या कठीण परिस्थितीतही रेशन वितरण व रोजगाराच्या संधी निर्माण करुन करवाही, दुलारा गावच्या ग्रामस्थांना अपार पाठिंबा देण्यात आला.

वर्ष २०१७ पासून, ब्लू डार्ट एक्‍स्‍प्रेस लिमिटेडने ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि सिक्कीम या पाच भारतीय राज्यांमध्ये Grow-Trees.com सोबत सहकार्याने एकूण ४,५२,००० वृक्ष लावले आहेत आणि हे वृक्ष जवळपास ९ दशलक्ष किग्रॅ कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याची अपेक्षा आहे. या मोठ्या प्रमाणातील वृक्षारोपणाने इको-टूरिझमला चालना देण्‍यामध्‍ये, हरित आच्‍छादन वाढवण्‍यामध्‍ये आणि आदिवासी-ग्रामीण समुदायांना, विशेषत: गोंड जमातीमधील महिलांना पाठिंबा मिळण्‍यामध्‍ये मदत केली आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना ब्‍लू डार्ट एक्‍स्‍प्रेस लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. बालफोर मॅन्‍युअल म्‍हणाले, ”जगभरातील समुदायांशी जबाबदार राहण्याची आणि त्यांच्याशी कार्य करण्याची बांधिलकी यावर भर देण्याकरिता स्थिरता हा आमची मूळ कंपनी डॉईश पोस्ट डीएचएलच्या (डीपी डीएचएल) धोरणाचा अविभाज्य भाग राहिला आहे. आमचा ग्रुप-वाइड पर्यावरण संरक्षण उपक्रम ‘गो ग्रीन’चा मुख्य उद्देश ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि / किंवा टाळणे आणि आपल्या वातावरणाचे संरक्षण व जतन करणे आहे. या दिशेने १११,००० वृक्षे लावणे हा आमचा आणखी एक उपक्रम आहे आणि लॉजिस्टिक क्षेत्र हरित व अधिक शाश्वत बनविण्‍याचा आमचा हा प्रयत्‍न आहे. आम्ही वर्ष २०२० मध्ये कचरा निर्मूलन करण्‍याचे आणि आमच्या उत्पादनांमध्ये अधिक मूल्य टिकवून ठेवण्याचे मार्ग शोधत राहू.”

Grow-Trees.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिक्रांत तिवारी म्‍हणाले, “ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडने पुढाकार घेऊन आपण एक समुदाय म्‍हणून गृहीत धरत असलेल्‍या आपल्‍या जीवनाचा एक पैलू पर्यावरणाप्रती जबाबदारी घेत असल्‍याचे पाहून आम्‍हाला आनंद झाला आहे. ग्रामीण समुदायांनी जंगलतोड झाल्‍यामुळे पेंच व्‍याघ्र प्रकल्‍पातील वन्‍यजीव कशाप्रकारे गावांमध्‍ये प्रवेश करत आहेत आणि त्‍यामुळे प्राणी व ग्रामस्‍थांना हानी व जखमा होत आहेत, हे निदर्शनास आणून दिले आहे. या प्रदेशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीविषयक कामांवर अवलंबून आहे, प्राण्‍यांच्या हल्ल्यामुळे त्‍यामध्ये अडथळा येऊ शकतो. प्रदेशात लागवड केलेले वृक्ष जंगलातील वाघांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती संसाधने उपलब्ध करुन देण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही फायदा करून देतील. नजीकच्या जैवविविधतेच्या शाश्वत विकासासाठी हा सहयोग फलदायी ठरेल, अशी आम्‍ही आशा करतो.”

पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात भारताच्या वाघांची लक्षणीय संख्या आहे आणि जगातील सर्वात महत्त्वाचे वाघांच्या निवासस्थानांमध्ये हे स्थान आहे. या वर्षाच्या मोहिमेसाठी पेंच आणि कान्हा नॅशनल पार्क यांच्यात वन्यजीव कॉरिडोर निवडण्याचे उद्दीष्ट म्हणजे या प्रदेशात राहणा-या वाघांना वास्‍तव्‍यासाठी अधिक जागा उपलब्‍ध करून देणे, यामुळे त्यांचे अस्तित्त्व आणि वाढ होण्याची शक्यता वाढेल. करवाही गावाच्या आसपासच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील परिघावर लागवड केलेले वृक्ष वाघाचे वास्तव्य सुरक्षित ठेवतील तसेच या भागात राहणा-या आदिवासी समाजाला, तसेच जंगलातील अन्न, इंधन व उदरनिर्वाहासाठी वृक्षांवर अवलंबून असणा-यांकरिता वन्य संसाधनांचा पुरवठा करतील. वर्ष २०१८ मध्‍ये, रोडकिलिंग टाळण्यासाठी आणि प्राण्यांना सुरक्षित मार्ग मिळावा म्हणून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील कान्हा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात राष्‍ट्रीय महामार्ग ४४ वर नऊ अंडरपासेस देखील तयार करण्यात आले.

ब्‍लू डार्ट सभोवतालच्‍या परिसराच्‍या सुरक्षिततेप्रती दृढ कटिबद्ध आहे. ”कनेक्टिंग पीपल, इम्‍प्रूव्हिंग लाइव्‍ह्ज’ या तत्त्वांतर्गत ब्‍लू डार्टचा तीन मुख्‍य आधारस्‍तंभांवर फोकस आहे, ते म्‍हणजे गोटीच (शिक्षण यंत्रणा प्रबळ करणे), गोग्रीन (पर्यावरणाचे संरक्षण करणे) आणि गोहेल्‍प (आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद), ज्‍यामधून समुदाय व पर्यावरणावर यशस्‍वीरित्‍या सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याचा कंपनीचा मनसुबा आहे.

ब्‍लू डार्ट ‘मिशन २०५० – झीरो इमिशन्‍स’ला अधिक पुढे घेऊन जात आहे. परिवहन विभागाच्‍या भविष्‍यासाठी प्रमाण स्‍थापित करत आणि जगातील समुदायाला जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षाही कमी करण्‍याच्‍या ध्‍येयांपर्यंत पोहोचण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी आपल्‍यापरीने प्रयत्‍न करत विना उत्‍सर्जन लॉजिस्टिक्‍सप्रती व्‍यवसायाला चालना देण्‍याचे ब्रॅण्‍डचे मिशन आहे. या मिशन २०५० उपक्रमांतर्गत ब्‍लू डार्टने मागील चार वर्षांमध्‍ये भारतात ४५२,००० हून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. ज्‍यामुळे डीपीडीएचएल ग्रुपच्‍या दरवर्षाला १ दशलक्ष वृक्षांची लागवड करण्‍याच्‍या जागतिक लक्ष्‍यामध्‍ये १० टक्‍क्‍यांहून अधिक योगदानाची भर झाली आहे.

वृक्षाची कार्बन प्रमाण कमी करण्‍याची क्षमता प्रत्‍येक प्रजातीमध्‍ये वेगवेगळी असते. वाढलेल्‍या वृक्षामध्‍ये दरवर्षाला २० किग्रॅ कार्बन प्रमाण कमी करण्‍याची क्षमता असते.

वृक्षांची वाढ प्रत्‍येक प्रजातीनुसार वेगवेगळी असते. जंगलातील प्रजातींना वाढण्‍यासाठी ७ ते ८ वर्षे लागतात आणि ही वाढ जमिनीची स्थिती, वातावरणातील बदल इत्‍यादी सारख्‍या विविध घटकांवर अवलंबून असते.