sensex

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजार(mumbai share market) उच्चांक नोंदवत होता. मात्र आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स(sensex) १८०० अंकांनी कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजार(mumbai share market) उच्चांक नोंदवत होता. मात्र आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स(sensex) १८०० अंकांनी कोसळला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३,३०० अंकांपर्यंत खाली घसरला.

इंग्लंडमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा प्रकार, जगभरातील प्रवासावरचे निर्बंध, कोरोनाच्या लस येण्याबाबतची अनिश्चितता या सगळ्यांचे प्रतिकूल परिणाम शेअर बाजारात दिसले.

ओएनजीसीच्या शेअरमध्ये तब्बल ९ टक्के घसरण झाली. गेल्या आठवडयाच्या शेवटच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना मुंबई निर्देशांक प्रथमच ४७ हजारावर पोहोचला होता. मात्र कोरोनाचा नवीन प्रकार आढळला असून जगातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले आहेत. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. याचाच हा परिणाम असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.