शेअर बाजारात घसरणीला ब्रेक; जाणून घ्या आजचा निर्देशांक

चीनची अर्थव्यवस्था मजबूत असल्याची घोषणा करण्यात आल्याने आशियाई बाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बजाज फिनसर्वच्या शेअरमध्ये सर्वाधिक ६.७७ टक्क्यांनी वाढ झाली.

  • सेन्सेक्स  ८३४
  • निफ्टीत २३९ अंकाची वाढ

मुंबई. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत व गुंतवणूकदारांनी खरेदी वाढविल्याने मंगळवारी शेअर बाजारात घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्समध्ये ८३४ अंकांची वाढ होवून निर्देशांक ४९३९८ वर पोहोचला. तर निफ्टीत २३९ अंकाची वाढ होवून निर्देशांक १४५२१ वर स्थिरावला.

चीनची अर्थव्यवस्था मजबूत असल्याची घोषणा करण्यात आल्याने आशियाई बाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बजाज फिनसर्वच्या शेअरमध्ये सर्वाधिक ६.७७ टक्क्यांनी वाढ झाली. तर बीएसईच्या २११९ कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ व ८७९ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदविली. बीएसईचा मार्केट कॅप १९६.२० लाख कोटींवर पोहोचला. टाटा मोटर्स, बजाज फायनान्समध्ये प्रत्येकी पाच टक्क्यांनी वाढ झाली. तर आयअीसी, ब्रिटानिया, टेक महिंद्राच्या शेअरमध्ये घसरण नोंदविली. जपानच्या निक्केई इंडेक्समध्ये १.३३ तर, दक्षिण कोरियाच्या कोस्पी इंडेक्समध्ये २.६१ टक्क्यांनी वाढ झाली. हाँगकाँगच्या बाजारात तेजी तर चीनच्या बाजारात मात्र घसरण नोंदविण्यात आली.