BSNL चा युजर्सला झटका,३० रुपयांनी प्लान्स महागले

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना झटका देत ब्रॉडबँड प्लानच्या मासिक शुल्कात २० ते ३० रुपयांची वाढ केली आहे. या प्लानची नवी किंमत १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. कंपनीने या संबंधीचे नोटिफिकेशनही जारी केले आहे.

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने ब्रॉडबँड प्लानच्या मासिक शुल्कात २० ते ३० रुपयांनी वाढ केली आहे.बीएसएनएलने घोषणा केली आहे की, १ ऑगस्ट २०२० पासून कंपनीच्या काही ब्रॉडबँड प्लानच्या मासिक शुल्कात बदल होणार आहे.  काही ब्रॉडबँड युजर्सला प्लानची किंमत वाढली असल्याचे नोटिफिकेशनही पाठविले आहे तर बीएसएनएलच्या केरळ सर्कलने यासंबंधी अधिकृत नोटिफिकेशनही जारी केले आहे. बीएसएनएल एकूण १७ ब्रॉडबँड प्लान ऑफर करते. आता कंपनीने फक्त ७ प्लान्सच्या किंमतीत बदल केले आहेत.

कोणत्या प्लानची किती आहे किंमत

टेलिकॉमटॉक नुसार, कंपनीने 2GB BSNL CUL प्लानचे मासिक शुल्क ३४९ रुपये होते यासाठी आता युजर्साला ३६९ रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लानमध्ये ग्राहकाला २जीबी डेटा 8Mbpsच्या स्पीडने मिळणार आहे. २ जीबीनंतर स्पीड कमी होऊन 1Mbps होणार आहे. याशिवाय प्लानमध्ये बीएसएनएल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग व अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ६०० रुपयांची कॉलिंग मिळणार आहे. सोबतच यात रात्री १०.३० पासून सकाळी ६ वाजेपर्यंत आणि रविवारी अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

कंपनीने सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देणाऱ्या 2GB CUL प्लानची किंमत वाढवली आहे. या प्लानची किंमत ३९९ रुपये प्रति महिना याऐवजी ४१९ रुपये प्रति महिना अशी करण्यात आली आहे. अनलिमिटेड कॉलिंगशिवाय यात सर्व सुविधा 2GB BSNL CUL प्लानच्या आहेत. अशाप्रकारे कंपनीने 3GB CULप्लानची किंमत ४९९ रुपयांऐवजी त्यात वाढ करून ५१९ रुपये केली आहे. तर 4GB CUL प्लानची किंमत 599 रुपयांऐवजी ६२९ रुपये, 5GB CUL प्लानची किंमत ६९९ रुपयांऐवजी वाढवून ७२९ रुपये करण्यात आली आहे.

हे दोन प्लानही महागले

कंपनीने Superstar 300 किंमतीत वाढ करून 749 रुपयांऐवजी 779 रुपये केली आहे. यात ग्राहकांना 300GBजीबी पर्यंत डेटा  10Mbps चा स्पीड मिळतो. लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 2Mbps होतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आली आहे. याशिवाय बीएसएनएलने 15GB CUL प्लानची किंमत 999 रुपयांऐवजी वाढवून 1029 रुपये केली आहे.