बाजारात तेजीचा ट्रेंड; निफ्टीने ओलांडली १० हजारांची पातळी

मुंबई :आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीने १० हजारांची पातळी ओलांडण्यात कमालीचे यश मिळवले आहे. तसेच मेटल आणि बँकिंग स्टॉक्सनी २ टक्के वृद्धी घेतली आहे. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स २.०९% किंवा

 मुंबई : आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीने १० हजारांची पातळी ओलांडण्यात कमालीचे यश मिळवले आहे. तसेच मेटल आणि बँकिंग स्टॉक्सनी २ टक्के वृद्धी घेतली आहे. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स २.०९% किंवा ७००.१३ अंकांनी वाढून ३४.२०८.०५ अंकांवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. निफ्टीमध्ये २.१३ टक्के  किंवा २१०.५० अंकांची वृद्धी होऊन तो १०,०९१ अंकांवर बंद झाला.

आजच्या सत्रात जवळपास ८६७ शेअर्सनी नफा कमावला तर ७०६ शेअर्सनी नुकसान अनुभवले. तसेच १३३ स्टॉक्सचे मूल्य बदलले नाही. आजच्या व्यापारी सत्रातील एशियन पेंट्स , बजाज ऑटो, एचयूएल, टीसीएस आणि एअरटेल इत्यादी कंपन्या टॉप लूझर्स ठरले आहेत. तर बजाज फिनसर्व्ह, कोल इंडिया, झी एंटरटेमेंट, बजाज फायनास्स, वेदान्ता इत्यादी व्यापारी मार्केटमधील टॉप गेनर्स ठरले आहेत.