ट्युबोर्ग व्हाइटसह कार्ल्सबर्ग इंडियाचा गव्हापासून बनलेल्या बीअरच्या श्रेणीत प्रवेश

भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, या खास उद्दिष्टाने डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील आमच्या आरअँडडी सेंटरमधील आमच्या तज्ज्ञ ब्र्यूअर्सनी या बीअरची रेसिपी विकसित केली आहे. ज्यासाठी ट्युबोर्गवर जगभरात प्रेम केले जाते ते प्रख्यात असे सातत्य आणि परिपूर्णता यांचा संगम या नव्या पेयात आहे. महाराष्ट्रात हे नवे पेय ५०० मिलीचा कॅन, तसेच ३३० मिलीच्या बाटलीत अनुक्रमे १७० रुपये आणि १४० रुपये अशा आकर्षक किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • जागतिक स्तरावरील अनुभवाच्या आधारे युरोपियन शैलीतील व्हीट-मॉल्ट ब्र्यूच्या सादरीकरणाद्वारे ताजेतवाने करणारा विनासायास पेयानुभव

मुंबई : ट्युबोर्ग व्हाइटच्या शुभारंभासह कार्ल्सबर्ग इंडियाने गव्हाच्या बीअरच्या प्रीमिअम श्रेणीत प्रवेश केला आहे. ट्युबोर्गचे हे नवे उत्पादन कुठल्याही सामान्य लाजरपेक्षा हटके आहे. काहीशी फळाची चव असणाऱे आणि ताजेतवाने करणारे हे क्लाउडी ड्रिंक आहे. आपले मित्र आणि कुटुंबीय यांच्यासह आनंद लुटता येईल, अशा वेगळ्या चवीच्या पेयाच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी कार्ल्सबर्ग इंडियाच्या पोर्टफोलिओमधून ही आणखी एक प्रीमियम बीअर सादर करण्यात येत आहे.

गेल्या दशकभरात भारतात गव्हाच्या बीअरची मागणी वाढत असून एकनिष्ठ ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. सातत्यपूर्ण ताज्यातवान्या चवीचे पेय उपलब्ध करून दिल्यास या श्रेणीचा आणखी विस्तार करण्याची संधी आहे.

भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, या खास उद्दिष्टाने डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील आमच्या आरअँडडी सेंटरमधील आमच्या तज्ज्ञ ब्र्यूअर्सनी या बीअरची रेसिपी विकसित केली आहे. ज्यासाठी ट्युबोर्गवर जगभरात प्रेम केले जाते ते प्रख्यात असे सातत्य आणि परिपूर्णता यांचा संगम या नव्या पेयात आहे. महाराष्ट्रात हे नवे पेय ५०० मिलीचा कॅन, तसेच ३३० मिलीच्या बाटलीत अनुक्रमे १७० रुपये आणि १४० रुपये अशा आकर्षक किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पेयातील घटक आणि वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगशी सुसंगत असे सर्वाधिक प्रीमिअम दरातील हे ट्युबोर्गचे पेय आहे.

यासंदर्भात कार्ल्सबर्ग इंडियाच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष पार्था झा म्हणाले, “ट्युबोर्ग व्हाइटचा शुभारंभ भारतीय बाजारपेठेशी असलेल्या आमच्या बांधिलकीला अधोरेखित करणारा आहे. ट्युबोर्ग व्हाइट हा भारतीय ग्राहकांसाठी खास विकसित केलेले युरोपियन शैलीतील पेय आहे. फळांची किंचित चव असलेले, प्यायल्या अतिशय सोपे व ताजेतवाने करणारे हे पेय केवळ लाजर पिणाऱ्यांनाच नव्हे, तर नेहमीच्या चवीत बदल हवे असलेल्या सर्वच ग्राहकांना आवडेल, याची आम्हाला खात्री आहे. आमची उत्पादन व वितरण क्षमता लक्षात घेता आम्ही या श्रेणीत चांगल्या प्रकारे विस्तार करू आणि आमच्या ग्राहकांना असेच रोमांचित करणारे पर्याय देत राहू, असा आम्हाला विश्वास आहे.”

ट्युबोर्ग व्हाइट हे सध्या महाराष्ट्रात उपलब्ध असून येत्या काही महिन्यांत ते अन्य राज्यांतही उपलब्ध होणार आहे.