दिमाखात सण साजरा करा! सॅमसंकडून सॅमसंग फॅन्‍सना रिवॉर्ड देण्‍यासाठी फ्लिपकार्टवर अद्वितीय लॉयल्‍टी उपक्रम ‘सॅमसंग होम’ सादर

हा उपक्रम ग्राहकांना ३० सप्‍टेंबर २०२१ पर्यंत सॅमसगचे नवीन टेलिव्हिजन्‍स, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्स किंवा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या दुसऱ्या खरेदीवर खास लाभ देतो. फ्लिपकार्टवर २८ जुलै २०२१ रोजी किंवा त्‍यानंतरच्‍या दिवसांमध्‍ये सॅमसंग ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादने खरेदी केलेले ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

  • ग्राहक टीव्‍ही, रेफ्रिेजरेटर्स, मायक्रोवेव्‍ह्ज व वॉशिंग मशिन्‍स अशा सॅमसंग कन्‍झ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या दुसऱ्या खरेदीवर 'सॅमसंग होम' उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात
  • ३० सप्‍टेंबर २०२१ पर्यंत पहिल्‍या ईएमआयवर ५० टक्‍के (जवळपास २,५०० रूपये) सूट मिळवू शकतात

नवी दिल्ली : सॅमसंग या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने नुकतीच फ्लिपकार्टसोबत सहयोगाने अद्वितीय ग्राहक लॉयल्‍टी उपक्रम ‘सॅमसंग होम’ची घोषणा केली. हा अद्वितीय ग्राहक लॉयल्‍टी उपक्रम विद्यमान सॅमसंग ग्राहकांना किफायतशीर लाभ देत सूट देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍याद्वारे सॅमसंगच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादनांप्रती त्‍यांनी दाखवलेली आवड व पसंतीला प्रशंसित करण्‍यात येत आहे.

हा उपक्रम ग्राहकांना ३० सप्‍टेंबर २०२१ पर्यंत सॅमसगचे नवीन टेलिव्हिजन्‍स, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्स किंवा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या दुसऱ्या खरेदीवर खास लाभ देतो. फ्लिपकार्टवर २८ जुलै २०२१ रोजी किंवा त्‍यानंतरच्‍या दिवसांमध्‍ये सॅमसंग ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादने खरेदी केलेले ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

या उपक्रमांतर्गत ग्राहक त्‍यांच्‍या पहिल्‍या ईएमआयच्‍या (जवळपास २,५०० रूपये) रक्‍कमेच्‍या फक्‍त ५० टक्‍के रक्‍कम भरण्‍यास पात्र ठरतील आणि त्‍यानंतरच्‍या खरेदी विभिन्‍न उत्‍पादन विभागामाधून असतील तर हा लाभ लागू असेल. उदाहरणार्थ, गाहकाने फ्लिपकार्टवर २८ जुलै २०२१ रोजी किंवा त्‍यानंतरच्‍या दिवसांमध्‍ये सॅमसंग टेलिव्हिजन खरेदी केला असेल तर ३० सप्‍टेंबर २०२१ पर्यंत वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर किंवा मायक्रोवेव्‍हच्‍या खरेदीवर या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो.

”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही फ्लिपकार्टसोबत सहयोगाने अद्वितीय उपक्रम ‘सॅमसंग होम’ सुरू करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत. या उपक्रमाचे सॅमसंग लॉयलिस्‍ट्सवर लक्ष केंद्रित असून त्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानासह त्‍यांची लिव्हिंग रूम अपग्रेड करण्‍यासाठी खरेदी करणाऱ्या दुसऱ्या सॅमसंग ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादनावर रिवॉर्ड देण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम आमच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीवर वैध आहे आणि या उपक्रमासह आम्‍हाला विशेषत: ग्राहक घरीच अधिक वेळ व्‍यतित करत असताना त्‍यांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍याची खात्री आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या कन्‍झ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍समधील ऑनलाइन व्‍यवसायाचे वरिष्‍ठ संचालक संदीप सिंग अरोरा म्‍हणाले.

‘सॅमसंग होम’ लॉयल्‍टी उपक्रमाचा लाभ घेण्‍याच्‍या पायऱ्या:

  • पहिल्‍या सॅमसंग ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादनाची खरेदी फ्लिपकार्टवर १५ सप्‍टेंबरपूर्वी केलेली असावी.
  • पहिल्‍या खरेदीनंतर सॅमसंग होम उपक्रम आपोआपपणे कार्यान्वित होतो.
  • ग्राहक सॅमसंगचे नवीन टेलिव्हिजन्‍स, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्स किंवा मायक्रोवेव्‍ह्जची दुसरी खरेदी फ्लिपकार्टवर ३० सप्‍टेंबर २०२१ पूर्वी करू शकतात.
  • या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी पहिली खरेदी व दुसरी खरेदी यामध्‍ये १५ दिवसांचे अंतर असले पाहिजे.
  • ग्राहकांना त्‍यानंतरच्‍या खरेदीवरील पहिल्‍या ईएमआयवर (जवळपास २,५०० रूपये) ५० टक्‍के सूट मिळेल.