charge upi payment january 1 2021 only paytm app skipped
UPI ट्रान्झेक्शन करताय? 'हे' ॲप वापरल्यास चार्ज लागणार नाही; १ जानेवारीपासून होतोय बदल

आधी व्यवस्था निर्माण करायची. सुरू केल्यानंतर ती काही दिवस मोफत द्यायची आणि त्यानंतर त्यावर शुल्क आकारणी करायची हा मोदी सरकारचा सर्वसामान्यांच्या खिशावर केलेला हल्ला आहे. आपलेच पैसे आपण कसे वापरायचे हे आता शिकवण्याची हिटलरशाहीच मोदी सरकारने सुरू केली आहे.

नोटाबंदीनंतर सुरू झालेले आणि आजवर मोफत असलेल्या युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला १ जानेवारीपासून पैसे मोजावे लागणार आहेत. जर कोणी थर्ड पार्टी युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी चार्ज आकारण्यात येणार आहे. थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अ‍ॅपची एकाधिकारशाही राहणार नाही.

हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआई) घेतला आहे. NPCI ने याचबरोबर थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी विविध निर्णय घेतले. यापैकी काही निर्णयांचा फायदा झाला तर काही निर्णय हे हळूहळू जाचक ठरत आहेत. त्यापैकीच हा एक निर्णय आहे. आधी व्यवस्था निर्माण करायची. सुरू केल्यानंतर ती काही दिवस मोफत द्यायची आणि त्यानंतर त्यावर शुल्क आकारणी करायची हा मोदी सरकारचा सर्वसामान्यांच्या खिशावर केलेला हल्ला आहे. आपलेच पैसे आपण कसे वापरायचे हे आता शिकवण्याची हिटलरशाहीच मोदी सरकारने सुरू केली आहे.

पेटीएमच्या ग्राहकांवर या नियमाचा परिणाम होणार नाही. युपीआय पैसे ट्रान्सफर करताना लावण्यात येणारा हा चार्ज पेटीएमला लागणार नाही.