चिनी कंपनी महाराष्ट्रात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

चीनमधील सर्वात उत्तम आणि आघाडीवर असलेली उत्पादन कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्सने’ काल मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती समोर आली

चीनमधील सर्वात उत्तम आणि आघाडीवर असलेली उत्पादन कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्सने’ काल मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही चीनी कंपनी तब्बल १ बिलियन डॉलर म्हणजेच ७६०० कोटी रूपये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव येते उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी ग्रेट वॉल मोटर्स कंपनीने राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे जवळपास राज्यातील तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

जीडब्ल्यूएमच्या भारतीय सहाय्यक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्कर शी यांनी सांगितले की, हा एक अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानासह उत्पादन घेता येणारा एक स्वयंचलित प्रकल्प असेल. त्यामुळे आम्ही टप्प्या-टप्प्याने भारतात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाच्या प्रीमियम प्रोडक्ट्सचे उत्पादन, आर अँड डी सेंटर, पुरवठा साखळी तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने तीन हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे.