Commercial partnership between Singapore Airlines and Vistara
सिंगापूर एअरलाईन आणि विस्तारा यांची वाणिज्यिक भागीदारी

या करारामुळे सिंगापूर एअर लाईन्स आणि विस्तारा यांच्यातील भागीदारी अधिक बळकट झाल्याने दोन्ही विमान कंपन्यांना सिंगापूर आणि भारत यांच्यातील सेवांबद्दल अधिक समन्वय साधता येईल.

मुंबई : टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिंगापूर एअरलाईन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या विस्तारा आणि सिंगापूर एअर लाईन्स यांच्यात वाणिज्यिक सहकार्याचा करार झाला आहे. सिंगापूरमधील नियामक मान्यतेच्या अधीन असलेला हा करार २०१७ मधील ‘कोडशेअर’ भागीदारीचा विस्तार आहे. या करारामुळे सिंगापूर एअर लाईन्स आणि विस्तारा यांच्यातील भागीदारी अधिक बळकट झाल्याने दोन्ही विमान कंपन्यांना सिंगापूर आणि भारत यांच्यातील सेवांबद्दल अधिक समन्वय साधता येईल.

दक्षिण पूर्व आशिया,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रमुख क्षेत्रांप्रमाणे. कोरोना पश्चात नागरी हवाई उद्योगात सुधारणा झाल्यामुळे आणि प्रवासाच्या मागणीनुसार आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास सुलभतेत सुधारणा होत असल्याचा फायदा दोन्ही विमान कंपन्यांना होईल.