McDonald’s : मॅक स्पायसी फ्राइड चिकनला ग्राहकांची पसंती

भारतातील एकमेव सर्वोत्तम बर्गर देणारे ठिकाण अशी ओळख निर्माण करून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केल्यानंतर हार्डकॅसल रेस्टॉरंट्स प्रा. लि. (वेस्टलाइफ डेव्हलपमेंट लिमिटेडची सबसिडरी)ची मालकी असलेले मॅकडोनाल्ड्स इंडिया (पश्चिम आणि दक्षिण) फ्राइड चिकन बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहे.

मुंबई : भारतातील एकमेव सर्वोत्तम बर्गर देणारे ठिकाण अशी ओळख निर्माण करून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केल्यानंतर हार्डकॅसल रेस्टॉरंट्स प्रा. लि. (वेस्टलाइफ डेव्हलपमेंट लिमिटेडची सबसिडरी)ची मालकी असलेले (McDonald’s India) मॅकडोनाल्ड्स इंडिया (पश्चिम आणि दक्षिण) फ्राइड चिकन बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहे.

दक्षिण भारतातील ग्राहकांच्या जिव्हांना तृप्ती देण्यासाठी या ब्रँडने मॅक स्पाइस फ्राइड चिकन (Mac Spice Fried Chicken) हे फ्राइड चिकन बाजारात दाखल करून फ्राइड चिकनच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. मॅक स्पायसी फ्राइड चिकन हे उत्तम दर्जाच्या चिकनपासून तयार केले जाते आणि संपूर्ण बाजारपेठेतील एकमेव असे चिकन आहे, जे हाडाच्या खालीही मसालेदार आहे. दक्षिण भारतातील बाजारपेठेत हे उत्पादन विशेषतेने उपलब्ध आहे. कंपनीच्या चिकन नगेट्स, स्ट्रिप्स आणि चिकन बर्गरच्या श्रेणीमध्ये ही आणखी एक लज्जतदार भर कंपनीने घातली आहे.

नवे मॅक स्पायसी फ्राइड चिकन हा आरोग्य आणि चव यांचा सर्वोत्तम मिलाफ आहे. कुरकुरीत आणि रसदार अशा या पदार्थामध्ये प्रथिनांचे भरपूर प्रमाण आहे आणि त्यात अनैसर्गिक फ्लेवर्स, रंग किंवा प्रिझर्वेटिव्हजही वापरलेले नाहीत. तसेच सर्वांत तिखट अशा घोस्ट पेपर मिरच्यांचा वापर करून ते चिकन मॅरिनेट केले आहे त्यामुळे ते हाडापर्यंत मसालेदार लागते. मॅकडोनाल्ड्सचा दर्जा आणि सुरक्षिततेची पातळी पूर्ण करण्यासाठी हे चिकन वेगवेगळ्या ६४ चाचण्यांमधून जाते, जेणेकरून थेट पोल्ट्री फार्ममधून ग्राहकांच्या ताटात ते पोहोचवले जाते. मॅकडोनाल्ड्स इंडिया सर्वोत्तम दर्जाच्या चिकनचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी करते आणि कोणतेही ग्रोथ प्रमोटर्स यात वापरले जात नाहीत.

चिकनच्या (chicken) नव्या प्रकारात ब्रँडने केलेल्या प्रवेशाबद्दल हार्डकॅसल रेस्टॉरंट्स प्रा. लि.(Hardcastle Restaurants Pvt. Ltd.) च्या एमडी स्मिता जाटिया म्हणाल्या, ”इतरांपेक्षा वेगळे आणि पठडीबाहेरचे पदार्थ आमच्या ग्राहकांना देण्यासाठी कंपनीच्या स्थापनेपासूनच आम्ही मेन्यूमध्ये संशोधन सुरू केले आहे. आमच्या दक्षिण भारतातील ग्राहकांशी बोलून आम्ही संशोधन केल्यावर आमच्या लक्षात आले की, त्यांना शेवटच्या घासापर्यंत कुरकुरीत, मसालेदार, विशिष्ट चवीचे असे चिकन हवे आहे या सखोल संशोधनानंतर आम्ही मॅक स्पायसी चिकन बाजारपेठेत आणले आणि ग्राहकांच्या मनासारखा पदार्थ त्यांना दिला. हा नवा पदार्थ बाजारपेठेत आणून आम्हाला संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांतील ग्राहकांना आकर्षित करून घ्यायचे आहे. ग्राहकांच्या प्रतिसादाने आम्ही खूपच आनंदात आहोत आणि भविष्यातील संधींसाठीही सज्ज आहोत.’’

मॅकडोनाल्डने (McDonald’s ) दक्षिण भारतात केलेल्या एका सखोल सर्वेक्षणातून लक्षात आले की, ग्राहकांना चिकन आणि मसालेदार पदार्थ खूप आवडतात. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठीच या ब्रँडने मॅक स्पायसी फ्राइड चिकन बाजारपेठेत आणले, जे कुरकुरीत, रसाळ आणि योग्य मर्यादेपर्यंत भाजलेले असते. जगभरातील सर्वाधिक तिखट मिरच्यांपैकी एक असलेल्या घोस्ट पेपर मिरचीमध्ये हे चिकन मॅरिनेट केले जाते. त्यामुळेच पहिल्या घासापासून शेवटच्या घासापर्यंत हे चिकन मसालेदार लागते. लागलेली भूक तातडीने शमवण्यासाठी तुम्हाला हवे असणारे पटकन आणि चविष्ट स्नॅक म्हणून तुम्ही हे चिकन खाऊ शकता, तुम्हाला चिकनच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत प्रेमाचा वर्षाव करायचा असेल तेव्हा तुम्ही बॉक्समधील हे चिकन विकत घेऊ शकता आणि कुटुंबासोबत भातावर ताव मारतानाही तुम्ही हे चिकन खाऊ शकता.

ग्राहकांनी त्यांची मागणी व्यक्त करण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मनासारखे पदार्थ उपलब्ध करून देण्यामध्ये पश्चिम आणि दक्षिण मॅकडोनाल्ड्स इंडिया आघाडीवर आहे. या महामारीच्या काळात आपल्या ग्राहकांना सातत्याने संपूर्णपणे स्पर्शविरहित सेवा देण्यासाठी ब्रँडने मॅक डिलिव्हरी या अ‍ॅपच्या माध्यमातून सतत स्पर्शविरहित घरपोच तसेच टेकआउट सेवा चालू ठेवली आहे. भारतात सेवाक्षेत्रात ड्राइव्ह-थ्रु प्रकारात आघाडीवर असलेल्या या ब्रँडने एक पाऊल पुढे टाकत मॅक डिलिव्हरी अ‍ॅपवर ‘ऑन द गो’ हे फीचर सुरू केले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकाला त्याच्या जवळच्या मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटमधून त्याच्या सोयीनुसार व सुरक्षितपणे त्याच्या वाहनापर्यंत डिलिव्हरी दिली जाते. या फीचरमुळे कमीत-कमी खर्चात जवळ-जवळ सर्व रेस्टॉरंट्सना ड्राइव्ह-थ्रु प्रकारात रूपांतरित केले आहे.

आपले ग्राहक आणि कर्मचारी यांच्या १०० टक्के सुरक्षिततेसाठी मॅकडोनाल्ड्स इंडिया पश्चिम व दक्षिण कोणतीही कसर सोडणार नाही.