खातेधारकांना घरबसल्या मिळणार २०,००० रुपये, SBIची नवीन डोअरस्टेप बँकिंग सुविधा; जाणून घ्या सविस्तर

एसबीआयने (SBI) डोअरस्टेप बँकिंगची सुविधा (Doorstep Banking facility)कोरोनाचे निर्बंध लक्षात घेऊन सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी बँकेने ही घरबसल्या पैसे जमा करण्याची आणि बँकेतील आपल्या खात्यातून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

  नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात स्टेट बँकेने ग्राहकांसाठी विविध सुविधा सुरू केल्या आहेत. आता यातीलच पुढचे पाऊल म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या ग्राहकांना घरपोच पैसे देणार आहे.

  एसबीआयने (SBI) डोअरस्टेप बँकिंगची सुविधा (Doorstep Banking facility)कोरोनाचे निर्बंध लक्षात घेऊन सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी बँकेने ही घरबसल्या पैसे जमा करण्याची आणि बँकेतील आपल्या खात्यातून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. याबरोबरच स्टेट बँक ग्राहकांना पे ऑर्डर्स, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्वेझिशन स्लीप याच्याशी निगडीत सुविधाही देणार आहे.

  एसबीआयची नवी डोअरस्टेप बँकिंगची सुविधा (Doorstep Banking facility)

  स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँकेच्या या नव्या डोअरस्टेप बँकिंग सुविधेमध्ये ट्रान्झॅक्शनची किमान मर्यादा १,००० रुपये आणि कमाल मर्यादा २०,००० रुपये इतकी आहे. बँक खात्यातून रोख रक्कम काढण्याआधी तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक आहे की नाही याची खातरजमा खातेधारकाने करून घ्यायची आहे. नव्या डोअरस्टेप बँकिग सुविधेसंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करत माहिती दिली आहे.

  स्टेट बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देताना म्हटले आहे की आता बँक तुमच्या दरवाज्यापर्यत. एसबीआय खातेधारकांना जर या सुविधेची अधिक माहिती हवी असेल तर ते https://bank.sbi/dsb या वेबसाईटवर जाऊन ती घेऊ शकतात.

  काय आहे डोअरस्टेप बँकिंग सुविधा (Doorstep Banking facility)

  • ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला होम ब्रॅंचमध्ये नोंदणी करावी लागणार आहे.
  • जोपर्यत कॉन्टॅक्ट सेंटरवर ही सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यत तुम्हाला होम ब्रॅंचकडे यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
  • डोअरस्टेप बँकिंग सुविधेअंतर्गत व्यवहार करण्यासाठीची म्हणजे पैसे काढण्याची आणि जमा करण्याची कमाल रक्कम मर्यादा २०,००० रुपये इतकी आहे.
  • डोअरस्टेप बँकिंग सुविधेमध्ये सर्व नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स (Non-financial transactions)साठी ६० रुपयांचे शुल्क जीएसटी अंतर्गत आकारण्यात येणार आहे. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स (Financial transactions)साठी १०० रुपयांचे जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे.
  • बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी चेक, विड्रॉवल फॉर्म आणि पासबुक यांची आवश्यकता असणार आहे.
  • संयुक्त खाते (Joint Account), मायनर अकाउंट, नॉन-पर्सनल अकाउंट या खात्यांना डोअरस्टेप बँकिंगची सुविधा मिळणार नाही.
  • ज्या खातेधारकांचा बँकेतील नोंदणीकृत पत्ता बँकेच्या होम ब्रॅंचपासून पाच किलोमीटर अंतरापेक्षा अधिक अंतरावर आहे त्यांना डोअरस्टेप बँकिंगची सुविधा मिळणार नाही.

  कोरोना महामारीत डिजिटल व्यवहारांच्या संख्येत वाढ

  कोरोना महामारीच्या काळात बॅंकिंग सुविधांमध्ये अनेक बदल झाले आहेत. खातेधारकांना बॅंकेच्या शाखेत जाणे शक्य होत नसल्यामुळे अनेक बॅंकांनी विविध सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत. याचबरोबर या कालावधीत डिजिटल बॅंकिंगच्या वापरातदेखील मोठी वाढ झाली आहे. मागील काही वर्षात देशातील डिजिटल इकॉनॉमी वाढत असतानाच आता डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या संख्येतदेखील मोठी वाढ झाली आहे. बॅंका यासाठी नेट बॅंकिग, मोबाईल बॅंकिंग सेवांचा वापर करत आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक खातेधारकदेखील डिजिटल व्यवहारांकडे वळले आहे.

  corona pandemic state bank of india sbi introduces new doorstep banking facility for account holders