पीएफ खातेधारकांना ‘दिवाळी गिफ्ट’? बँक खात्यात जमा होणार मोठी रक्कम

कर्मचारी भविष्य उदनिर्वाह निधी (ईपीएफओ) 6 कोटीहून अधिक खातेधारकांना ‘दिवाळी गिफ्ट’ देण्याच्या विचारात आहे. पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाची रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्याचे समजते(PF Benefits). सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओ लवकरच 6 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यांमध्ये 2020-21 साठी व्याज हस्तांतरित करण्याची घोषणा करू शकते.

    दिल्ली : कर्मचारी भविष्य उदनिर्वाह निधी (ईपीएफओ) 6 कोटीहून अधिक खातेधारकांना ‘दिवाळी गिफ्ट’ देण्याच्या विचारात आहे. पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाची रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्याचे समजते(PF Benefits). सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओ लवकरच 6 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यांमध्ये 2020-21 साठी व्याज हस्तांतरित करण्याची घोषणा करू शकते.

    2020-21 या आर्थिक वर्षासाठी ग्राहकांच्या खात्यावर पीएफवरील 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्यासाठी सरकारने आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कामगार मंत्रालयानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. आता ईपीएफओ लवकरच ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज रक्कम जमा करेल.

    ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षातही व्याज समान होते. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर उपलब्ध होते आणि पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आले होते.