डॉलर घसरला आणि सोन्याचा भाव वाढला, जाणून घ्या आजची किंमत

डॉलरच्या दरामधील (rate of dollar) घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुलभ चलन धोरण सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतीत (Gold Price today) आज वाढ दिसून येत आहे.

  मुंबई : डॉलरच्या दरामधील (rate of dollar) घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुलभ चलन धोरण सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतीत (Gold Price today) आज वाढ दिसून येत आहे.

  एमसीएक्सवर जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा दर सकाळी १०.२१ वाजता ११६ रुपयांच्या वाढीसह ४७२०९ च्या पातळीवर व्यापार करत होता. बुधवारी हा दर ४७०९३ च्या पातळीवर बंद झाला होता आणि आज ४७२४५ रुपयांच्या पातळीवर उघडला. ४७२९९ रुपये प्रति दहा ग्रॅम ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि ४७२०५ रुपये हा सर्वात कमी दर आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून ४७९२ रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे.

  डॉलरमध्ये सतत घसरण होत आहे. यावेळी डॉलर ०.०५३ (-०.०६%) च्या घसरणीसह ९०.५४० च्या पातळीवर खाली आला होता. डॉलरच्या तुलनेत एमसीएक्सवर जुलै डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत (Silver Price) ६२७ रुपयांच्या तेजीसह ६९६७० रुपयांवर होती. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा दर ६६४ रुपयांनी वाढून ६८४५० रुपये प्रतिकिलो होता. दरम्यान १० वर्षाच्या यूएस बाँड यील्डमध्येही आज घसरण दिसून येत आहे. सध्या हे प्रमाण १.६१ टक्के आहे.

  आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचे भाव यावेळी ११.१५ डॉलर (+ ०.६३%)च्या तेजीसह १७८५.०५ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता. यावेळी चांदीच्या वितरणातही तेजी दिसून येत आहे. यावेळी चांदीचा दर ०.३३५ डॉलर (+१.२८%)च्या वाढीसह २६.४२० डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. एका औंसमध्ये २८.३४ ग्रॅम असतात.

  आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी वाढून ७४.१०च्या पातळीवर उघडला. बुधवारी रुपया ७४.३६च्या पातळीवर बंद झाला होता. रिलायन्स सिक्युरिटीच्या मते, देशांतर्गत शेअर बाजार अजूनही मजबूत आहे, यामुळे रुपयालाही आधार मिळाला आहे.

  या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत ४ हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे.