कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे शेअर मार्केटमध्ये पडसाद, ‘इतक्या’ अंकांची झाली घसरण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर(corona effect on mumbai share market) झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी शेअर बाजार (share market down)उघडल्यानंतर सेन्सेक्स २१० अंकांनी घसरून ४८,९६९ वर जाऊन पोहोचला आहे. तसेच निफ्टी १४, ४७९ वर आला आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये(corona second wave) रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा देश लॉकडाऊनच्या(lockdown) उंबरठ्यावर आला असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम मुंबई शेअर(corona effect on mumbai share market) बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स २१० अंकांनी घसरून ४८,९६९ वर जाऊन पोहोचला आहे. तसेच निफ्टी १४, ४७९ वर आला आहे. यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    शेअर मार्केटमध्ये दिवसाची सुरुवात इतकी खराब झाल्याने व्यापारी आणि दलालांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या वर्षपुर्तीनंतर आज पुन्हा एकदा देशात  लॉकडाऊन होणार का? अशी भीती प्रत्येकाला सतावत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशात नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यातही महाराष्ट्रातील  वाढती कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आला. शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली.