सोन्याच्या दरात होणार भरमसाठ वाढ, कारणे समजून घ्या

आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.(gold prize hike) सोन्याचा दर ६० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

    मुंबई : जगभरात कोरोनामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशावेळी गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच चांगली संधी आहे.  आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.(gold prize hike) सोन्याचा दर ६० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

    एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून ते ४७,८६४ रुपयांवर पोहोचले आहे. एकाच महिन्यात सोन्याचा दर ८ टक्क्यांनी म्हणजे ३,६७४ रुपयांनी वाढला आहे. एप्रिल महिन्यात चांदीच्या भावातही ११ टक्क्यांनी म्हणजे ५,९४८ रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोना काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    कोरोनामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका शेअर बाजाराला देखील बसला आहे. शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून आता सोन्यात खरेदी करत आहे.

    का वाढणार सोन्याचा दर ?

    आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची घसरण होत आहे. देशात रुपयाच्या तुलनेतही डॉलर घसरण आहे. मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केल्यास मौल्यवान धातूंमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याची किंमत प्रति १७९२ डॉलरच्यावर गेली आहे. महागाईच्या आकड्यांनीही आठ वर्षांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे.