कोरोना काळात फ्लिपकार्टने २३ हजार जणांना दिल्या नोकऱ्या ; उत्पादकांची तेजीनं डिलिव्हरी करण्यासाठी मोठा निर्णय

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील ई-कॉमर्स सेवांची वाढती मागणी लक्षात घेता या नोकऱ्या देण्यात आल्यात. कारण लोक महामारीचा सामना करण्यासाठी घरातच राहतात, ज्यामुळे पुरवठा साखळी वाढलीय.

    नवी दिल्लीः फ्लिपकार्टने कोरोना संकटातही अनेकांना रोजगार दिलाय. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी २३ हजार लोकांना काम दिले. फ्लिपकार्ट ई कॉमर्स मार्केटप्लेसमध्ये आपल्या उत्पादकांची तेजीनं डिलिव्हरी करण्यासाठी पुरवठा साखळी बळकट करायची आहे.

    कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील ई-कॉमर्स सेवांची वाढती मागणी लक्षात घेता या नोकऱ्या देण्यात आल्यात. कारण लोक महामारीचा सामना करण्यासाठी घरातच राहतात, ज्यामुळे पुरवठा साखळी वाढलीय.

    फ्लिपकार्ट येथील पुरवठा साखळीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री म्हणाले, या चाचणी काळात त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व नवीन कर्मचार्‍यांना आमची आरोग्य सेवा आणि कल्याण उपक्रमाचा समावेश असेल.

    कंपनी कोविड सुरक्षा पद्धतींविषयी जागरूकता वाढविण्याकरिता सुरक्षा नियम आणि त्याच्या गोदामांमधील प्रोटोकॉलपासून ते पुरवठा साखळीच्या विविध बाबींमध्ये थेट गुंतवणुकीसाठी आपले प्रशिक्षण कार्यक्रम चालवित आहे.