गृह खरेदीदारांसाठी इझी लोन करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गृहकर्ज निवड आणि शिफारसीसाठी भारतातील पहिले अ‍ॅप सादर

गृहकर्जाच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून शेवटापर्यंत डिजीटल छाननीसाठी या अ‍ॅपच्या माध्यमातून विकसक, विक्रीच्या साखळीतील एजंट, ग्राहक, बँका आणि बँकेत्तर वित्तीय कंपन्या या सर्वांना एकाच मंचावर आणले जाते. कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित हे अ‍ॅप ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे सादर झालेल्या निवडक पर्यायांची तुलना करत ग्राहकांना योग्य कर्ज पर्यायाच्या निवडीस मदत करते.

  मुंबई : नव्या युगातील फिनटेक स्टार्ट-अपमधील नामांकित इझीलोन टेक्नो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (www.easiloan.com) गृहवित्त कंपन्यांसाठी “इझीलोन इन्स्टंट मॅच” हा नवीन पर्याय आणला आहे. घर खरेदीदारांची निवड आणि शिफारस करण्यासाठी गृहवित्त कंपन्यांसाठी कृत्रिम बुध्दिमत्ता ( एआय ) तंत्रज्ञानावर आधारित हा नवीन ऑनलाईन पर्याय आहे. “इझीलोन इन्स्टंट मॅच” च्या माध्यमातून गृहकर्ज प्रक्रियेतील त्रुटी-कमतरता हुडकून खरेदीदार, विकसक-विक्रेता आणि वित्तपुरवठादार यांच्यादरम्यानची कर्ज छाननी प्रक्रिया या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकसंध करण्याचे इझीलोन डॉट कॉमचे उद्दीष्ट आहे.

  गृहकर्जाच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून शेवटापर्यंत डिजीटल छाननीसाठी या अ‍ॅपच्या माध्यमातून विकसक, विक्रीच्या साखळीतील एजंट, ग्राहक, बँका आणि बँकेत्तर वित्तीय कंपन्या या सर्वांना एकाच मंचावर आणले जाते. कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित हे अ‍ॅप ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे सादर झालेल्या निवडक पर्यायांची तुलना करत ग्राहकांना योग्य कर्ज पर्यायाच्या निवडीस मदत करते.

  इझीलोनने एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज हाऊसिंग फायनान्स, पीएनबी, आयआयएफएल होम फायनान्स आणि अन्य आघाडीच्या गृहवित्त कंपन्यांबरोबर भागीदारी केलेली आहे. मुंबईत अनेक विकसकांसाठी इझीलोन गृहवित्तसाठी सेवा पुरवत असून पुणे आणि बंगळूरमधील विकसकांबरोबर येत्या काही महिन्यात भागीदारी करण्यासाठी सध्या चर्चा करत आहे.

  सध्या आपण डिजीटल युगात राहत असलो तरी भारतात गृहकर्ज मिळण्यात खुपच वेळ लागतो आणि कागदपत्रांच्या पुर्ततेची झंझट निस्तरावी लागते. या साऱ्या प्रक्रियेत अनेक पायऱ्यांवर कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि मान्यतेसाठी बँकांमध्ये चकरा माराव्या लागतात. येथेच आम्हाला आमचे कसब दाखवायचे आहे. त्यांच्या स्वप्नातील घरासाठी योग्य असा गृहवित्त पुरवठादार शोधताना ग्राहकांचा त्रास आणि तणाव दूर करण्याची आमची इच्छा आहे.

  कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करत संबंधित ग्राहकाची वैयक्तिक माहिती आणि त्याच्या गरजांना अनुरुप योग्य असा गृहकर्जाचा प्रस्ताव जुळवून देणारे भारतातील पहिले संगणकीय टूल सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इझीलोन डॉट कॉममध्ये डिजीटल मंचाच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती पुर्वनिकषां आधारे पात्र ठरविली जाते, जुळविली जाते आणि प्रक्रिया केली जात असल्याने यशाचा दर हा उच्च तर असतोच परंतु अतिशय कमी कालावधी लागतो.

  गृहकर्ज प्रस्तांवाची छाननी अतिशय वेगाने होत असल्याने बांधकाम विकसकाकडे निधीचा प्रवाह लवकर सुरु होता आणि कर्जाचा प्रस्ताव नाकारल्याने बुकींग रद्द होण्याचे प्रमाणही कमी होते. सध्या इझीलोन दरमहिन्याला काही हजार प्रकरणांची छाननी करते. नवीन बाजारपेठा काबीज करत ग्राहकांची संख्याही आम्ही वाढवत चाललो आहे. असे प्रतिपादन इझीलोनचे सहसंस्थापक प्रमोद कथुरिया यांनी केले.

  मागणीचे संकलन

  बांधकाम विकसक, दलाल आणि वैयक्तिक ग्राहक यांच्या पातळीवर तयार झालेल्या मागणीचे बँकींग क्षेत्रासाठी संकलन करण्याचे कार्यसुध्दा इझीलोन करते. बँकींग यंत्रणेत ग्राहकांची वैयक्तिक माहिती तयार करणे, वित्तसंस्थांशी जोड्या जुळविणे आणि स्वयंचलित छाननी प्रक्रिया राबवत विविध ग्राहकांच्या गृहकर्जाच्या गरजांबाबत इझीलोन अ‍ॅप रिअल इस्टेट विकासकाला एक विशिष्ट पर्यायही सादर करते.

  पुर्वनिकषात पात्र ठरलेल्या ग्राहकांची माहिती संबंधित बँका आणि गृहवित्त कंपन्यांना इझीलोन अॅपच्या माध्यमातून सादर केली जाते. त्यामुळे मंजुरीचा उच्च दर, मानवी चुकांचे अत्यल्प प्रमाण आणि कर्जमान्यता आणि वितरण अतिशय झटपट होते.

  विकसकाचे फायदे

  वेगवान प्रक्रियेमुळे विकसकाकडे निधीचा प्रवाह वेगाने वाढतो आणि कर्जमंजुरीअभावी बुकींग रद्द झाल्याने होणारा तोटा हा अतिशय कमी राहतो. कर्जमंजुरीअभावी ग्राहकाच्या ताब्यात अडकलेल्या अपार्टमेंटमुळे रिअल इस्टेट विकसकाला होणारा संधीत्मक तोट्याच्या समस्येवर हे अ‍ॅप काम करते.

  ग्रीन चॅनेलमुळे प्रक्रियेच्या वेळेत कमाल

  कर्जाचा अर्ज पुर्ततेसाठी बँकेकडे पाठविण्याअगोदर अर्जातील माहितीची छानणी आणि प्रक्रियेसाठी कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित तंत्रज्ञान वापरत इझीलोन डॉट कॉमने वित्तपुरवठादार संस्थांसाठी विकसित केलेल्या ग्रीन चॅनेलमुळे अर्जावरील प्रक्रिया क्षणार्धात होते