Equipped with millions of vendors training from Flipkart against the backdrop of Big Billion Days
बिग बिलियन डेजच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टकडून लाखो विक्रेते प्रशिक्षण घेऊन सज्ज; महिन्याभराची प्रशिक्षण व विकास कार्यशाळा मालिका

  • २०१९ मधील प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गांच्या तुलनेत यंदाच्या व्हर्च्युअल शिबिरात चौपट विक्रेत्यांचा सहभाग
  • बडोदा, नाशिक, राजकोट, त्रिवेंद्रम आदी शहरांमधील विक्रेतेही सहभागी

बंगळुरू : फ्लिपकार्ट या भारतीय ई कॉमर्स बाजारपेठेने आगामी उत्सवपर्वात व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी उपयुक्त असे मार्ग आणि माहिती यांची माहिती देण्यासाठी आपल्या देशभरातील विक्रेते वर्गासाठी महिन्याभराच्या प्रशिक्षण व विकास उपक्रमाचे आयोजन केले होते. बिग बिलियन डेज हा फ्लिपकार्टचा मुख्य सोहळा १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत होत असून विक्रेते, एमएसएमईज, मायक्रो बिझनेसेस, महिला उद्योजक, कारागिर, विणकर आणि हस्तकला कारागिरांना ई कॉमर्सचा फायदा घेऊन आपले व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्याची संधी मिळणार आहे.

फ्लिपकार्टच्या मार्गदर्शकांना भेटण्याची संधी विक्रेत्यांना न नाकारता कस्टमाइज्ड व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तब्बल महिन्याभराच्या कालावधीत हे १६ सत्रांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून देशभरातील विक्रेत्यांना एकास एक पद्धतीने प्रत्यक्ष नेटवर्किंग सत्र आणि प्रमुख मार्गदर्शकांच्या माध्यमातून टीमशी जोडता आले. तसेच, विक्रेत्यांना फ्लिपकार्टच्या नव्या उपक्रमांबद्दल जाणून घेता आले आणि उत्सवपर्वातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ते सज्ज होत असताना काही गोष्टी समजून घेता आल्या.
२०१९च्या तुलनेत यंदा या उपक्रमातील सहभागी विक्रेत्यांची संख्या चौपट होती. बडोदे, नाशिक, एर्नाकुलम, आग्रा, राजकोट, मथुरा, त्रिवेंद्रम यांसारख्या लहान शहरांमधूनही असंख्य विक्रेते प्रथमच सहभागी झाले होते. व्हर्च्युअल शिबिरामुळे देशातील कुठल्याही भागातून यात सहभागी होणे शक्य झाले.

या शिबिरांबाबत विक्रेते उत्साहित होते. त्यांना आता बिग बिलियन डेजचे वेध लागले आहेत. मथुरा येथील गौरव चौधरी याचा ‘रिटेल स्टोर’ या नावाने व्यवसाय असून तो ऑनलाइन ज्वेलरी विक्री करतो. त्याने त्याच्या संपूर्ण चमूसह यंदाच्या शिबिरात भाग घेऊन बिग बिलियन डेजसाठी फ्लिपकार्टने काय काय उपक्रम हाती घेतले आहेत, याचा तपशील समजून घेतला. गौरव २०१७ पासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून उत्पादन विक्री करत असून त्याच्या व्यवसायात उत्तरोत्तर वाढ होत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार दरवर्षी ग्राहक वर्तनात बदल होतो, त्यांच्याकडून नव्यानव्या मागण्या पुढे येतात. ऑनलाइन बाजारपेठेत पराकोटीची स्पर्धा असल्यामुळे येथे यशस्वीरित्या व्यवसाय करायचा असेल तर बाजारपेठेतील ताजे प्रवाह माहिती असणे आणि योग्य वेळी योग्य प्रकारे जाहिरात करणे महत्त्वाचे असते. “अशा प्रकारच्या उपक्रमामुळे आम्हाला दरवर्षी बदलत्या घटकांना योग्य प्रकारे जाणून घेऊन अपेक्षित मागणीच्या दोन पावले पुढे राहाणे शक्य होते. उत्सवपर्वासाठी आम्ही सज्ज होत असतानाच यावर्षी व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या या उपक्रमामुळे मला माझ्या चमूलाही यात सहभागी करून त्यांना काही नवे ज्ञान मिळवून देता आले.”

‘पतियाळा हाऊस’ या नावाने सूट्स, ड्रेस मटेरिअल्स, साड्या, लेहेंगा-चोली आदी, महिलांसाठीच्या एथनिक वेअरचा व्यवसाय करणारा निकुंज गोंदालिया हा दिल्लीस्थित विक्रेता देखील फ्लिपकार्टच्या या प्रशिक्षण व विकास उपक्रमाचा लाभार्थी आहे. २०१४ मध्ये तो फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर सहभागी झाला आणि आज त्याच्या व्यवसायाचा विस्तार होऊन त्याच्याकडे ४५ कर्मचारी आहेत. यापैकी काही उत्सवपर्वातील वाढीव व्यवसायाच्या पूर्ततेसाठी तात्पुरत्या स्वरुपात नेमले आहेत. दरवर्षी बिग बिलियन डेजसाठी तो आतूर असतो, कारण आठवडाभराच्या या सोहळ्यात त्याच्या व्यवसायात लक्षणीय वृद्धी होते. या उपक्रमामुळे त्याला फ्लिपकार्टच्या आघाडीच्या मार्गदर्शकांसह थेट संवाद साधून आगामी काही महिन्यांच्या दृष्टीने तयारी करण्यासंदर्भात चर्चा करता आली. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुप्त मागणी असून उत्सवपर्वातील मूल्यकेंद्री डील्ससाठी ग्राहक उत्सुक आहेत, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “दरवर्षीपेक्षा यंदा ग्राहक अधिक प्रमाणात किफायतशीर डील्सच्या शोधात असतील. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज राहू इच्छितो. या उपक्रमाच्या माध्यमातून काही सर्वोत्तम व्यवसाय पद्धतींची माहिती आम्हाला मिळाली, जिचा अवलंब आता मी व माझा चमू करेल, जेणेकरून कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने मागणीची पूर्तता आम्ही करू शकू आणि कुठल्याही डिलिव्हरीला विलंब होणार नाही.”

फ्लिपकार्टचे वरिष्ठ संचालक व मार्केटप्लेसचे प्रमुख जगजीत हरोदे म्हणाले, “फ्लिपकार्टच्या व्यासपीठाच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांसाठी मौल्यवान, आगळीवेगळी आणि किफायतशीर अशी उत्पादने घेऊन येण्यात आमचे विक्रेते भागिदार महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वोत्तम आणि हुशार पद्धती, ग्राहकांच्या वर्तनातील बारकावे आणि प्रत्यक्ष कामकाजात पाठबळ देऊन त्यांना या प्रवासात मदत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. अशा प्रकारच्या उपक्रमातून आम्ही त्यांच्याशी जोडले जाऊन त्यांच्या गरजा समजून घेतो. विशेषतः उत्सवपर्वात आपल्या व्यवसाय वाढीसाठी ते सज्ज होत असताना ही बाब महत्त्वाची आहे. तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर व्यवसायाचे लोकशाहीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट असून आमच्या व्यासपीठावरील लाखो एमएसएमईज, लघुव्यावसायिक आणि कारागिर, विणकर आणि हस्तकारागिरांना व्यवसायवाढीसाठी योग्य शिक्षण आणि बारकावे समजावून सांगण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

उत्सवपर्वात ग्राहकांकडील मागणीत वाढ होत असल्यामुळे व्यवसायांच्या दृष्टीने बहुप्रतीक्षित असा हा कालावधी असून अनेक विक्रेत्यांचा तर वर्षभराचा व्यवसाय या एका महिन्याभरात होत असतो. या कालावधीतल्या ऑनलाइन व्यवसायाचे यश हे विक्रेत्यांच्या सहभागावर आणि या व्यासपीठाबाबतची त्यांची समज यावर अवलंबून असते. त्यांना त्यांच्या या प्रवासात पाठबळ देण्यासाठीच फ्लिपकार्टचा हा उपक्रम आहे.