फॅनकोडतर्फे ऑनलाइन स्‍पोर्टस् फॅन मर्चंडायझिंग स्‍टोअर ‘फॅनकोड शॉप’ सादर

  • 'फॅनकोड शॉपचा मुंबई इंडियन्‍ससह आयपीएलमधील ६ संघांसोबत सहयोग

मुंबई : फॅनकोड (FanCode) या ड्रीम स्‍पोर्टसच्‍या (Dream Sports) भारतातील पहिल्‍या मल्‍टी-स्‍पोर्ट समूहक व्‍यासपीठाने ऑनलाइन स्‍पोर्टस् फॅन मर्चंडायझिंग स्‍टोअर ‘फॅनकोड शॉप’ (‘FanCode Shop’) सादर केले आहे. हे स्‍टोअर आघाडीच्‍या स्‍पोर्टस् ब्रॅण्‍डस (sports brands) च्‍या अस्‍सल व किफायतशीर फॅन गिअरची रेंज सुलभपणे उपलब्‍ध करून देईल. फॅनकोड शॉप भारताच्‍या सर्वात मोठ्या स्‍वदेशी स्‍पोर्टस् ब्रॅण्‍ड्सच्‍या अधिकृत परवानाकृत व्‍यापारासह सुरू झाले आहे. हे स्‍वदेशी स्‍पोर्टस् ब्रॅण्‍ड्स आयपीएल (ipl) चे ६ संघ आहेत – दिल्‍ली कॅपिटल्‍स, सनरायझर्स हैद्राबाद, मुंबई इंडियन्‍स, चेन्‍नई सुपर किंग्‍स, राजस्‍थान रॉयल्‍स आणि किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब.

फॅनकोड शॉप फॅन मर्चंडाइझची व्‍यापक रेंज देईल. या रेंजमध्‍ये मॅच जर्सीज, टी-शर्टस्, जॅकटे्स, जॉगर्स, कॅप्‍स, मास्‍क्‍स, फोन कव्‍हर्स, कोस्‍टर्स, कीचेन्‍स, रिस्‍टबॅण्‍ड्स यांचा समावेश आहे. फॅन गिअरमध्‍ये रेंजेस्, डिझाइन्‍स व स्‍टाइल्‍सचे विविध प्रकार असतील. ज्‍यामुळे प्रत्‍येक चाहत्‍याला अभिमानाने त्‍याचा फॅन्‍डम दाखवता येईल.

फॅनकोड शॉप फॅन गिअरची निर्मिती व वितरणामध्‍ये जलदपणे नाविन्‍यता आणण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करेल. ज्‍यामधून चाहत्‍यांना त्‍यांच्‍या आवडीचे स्‍पोर्टस् ब्रॅण्‍ड्स व संघांच्‍या आधुनिक, अधिक अद्ययावत डिझाइन्‍स मिळण्‍याची खात्री मिळेल. चाहते www.shop.fancode.com या वेबसाइटवर त्‍यांच्‍या आवडत्‍या आयपीएल संघाचे अधिकृत मर्चंडाइझ शोधू शकतात व खरेदी करू शकतात. फॅनकोड शॉपमध्‍ये ड्रीम स्‍पोर्टसच्‍या आकर्षक टी- स्‍पोर्टस् असलेल्‍या अॅथलेजर अॅपरल कलेक्‍शनची रेंज देखील असेल.

भारतातील क्रीडा व स्‍पोर्टस् मर्चं‍डायझिंग विभागाबाबत बोलताना फॅनकोडचे सह-संस्‍थापक यानिक कोलॅसो म्‍हणाले, ”आम्‍हाला काही सर्वात मोठ्या भारतीय स्‍पोर्टस् ब्रॅण्‍ड्ससोबत सहयोगाने फॅनकोड शॉप सादर करण्‍याचा आनंद होत आहे. फॅनकोड शॉपच्‍या माध्‍यमातून आमचा सर्व क्रीडाप्रेमींना अस्‍सल व किफायतशीर मर्चंडाइझ उपलब्‍ध करून देणारे व्‍यासपीठ सादर करण्‍याचा मनसुबा आहे. जलद परिवर्तनावर लक्ष केंद्रित करत आमचा चाहत्‍यांना निवडीसाठी अनेक पर्याय देण्‍याचा आणि त्‍यांच्‍या आवडींप्रमाणे डिझाइन्‍स व उत्‍पादने सानुकूल करण्‍याचा प्रयत्‍न आहे.”

शॉपच्‍या सादरीकरणाची घोषणा करताना फॅनकोडचे सह-संस्‍थापक प्रसन्‍ना कृष्‍णन म्‍हणाले, ”फॅनकोड शॉपच्‍या माध्‍यमातून भारतभरातील आयपीएल चाहत्‍यांना त्‍यांच्‍या घरामधूनच आरामशीरपणे आवडत्‍या संघाला पाठिंबा देण्‍यासोबत ‘त्‍यांच्‍या आवडीचे पोशाख परिधान करण्‍याची’ संधी मिळेल. दिल्‍ली कॅपिटल्‍स व सनरायझर्स हैद्राबाद सारख्‍या आयपीएल संघांनी उत्‍कट आवड असलेल्‍या निष्‍ठावान चाहत्‍यांसोबत प्रबळ ब्रॅण्‍ड नाते निर्माण केले आहे. आम्‍हाला त्‍यांच्‍या चाहत्‍यांना आवडत्‍या आयपीएल संघांना अभिमानाने पाठिंबा दाखवण्‍यासाठी आणखी एक संधी देण्‍याचा आनंद होत आहे.”

या सहयोगाबाबत बोलताना सनरायझर्स हैद्राबादचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी के. षणमुघम म्‍हणाले, ”आम्‍हाला यंदा सनरायझर्स हैद्राबादच्‍या फॅन मर्चंडाइझसाठी फॅनकोडसोबत सहयोग जोडण्‍याचा आनंद झाला आहे. फॅनकोड आमचे अधिकृत फॅन स्‍टोअर म्‍हणून आम्‍हाला आमच्‍या चाहत्‍यांसोबत संलग्‍नता वाढवण्‍यामध्‍ये मदत करेल. आम्‍हाला आशा आहे की, ऑरेंज आर्मीचे चाहते फॅनकोडने निर्माण केलेल्‍या विशेष मर्चंडाइझचे कौतुक करतील आणि त्‍यांच्‍या घरामधूनच आरामशीरपणे व सुरक्षितपणे दरवर्षीप्रमाणेच उत्‍साहात संघाला पाठिंबा देतील.”

या सहयोगाबाबत बोलताना दिल्‍ली कॅपिटल्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी धीरज मल्‍होत्रा म्‍हणाले, ”दिल्‍ली कॅपिटल्‍सला आमचा ऑफिशिअल मर्चंडाइझ पार्टनर म्‍हणून फॅनकोडसोबत सहयोग जोडण्‍याचा आनंद होत आहे. दिल्‍ली कॅपिटल्‍समध्‍ये आम्‍ही ‘फॅन फर्स्‍ट’ तत्त्वाला प्राधान्‍य देतो. सध्‍याच्‍या अनपेक्षित काळादरम्‍यान देखील आम्‍ही डिजिटल व्‍यासपीठांच्‍या माध्‍यमातून आमच्‍या चाहत्‍यांशी जोडलेलो आहोत. आम्‍ही फॅनकोडप्रमाणेच फॅन-फ्रेण्‍डली संघ असण्‍यावर भर देतो. म्‍हणूनच मला हा सहयोग आम्‍हा दोघांसाठी एकसमान लाभदायी असण्‍याचा विश्‍वास आहे.”

शॉप सादरीकरणाव्‍यतिरिक्‍त फॅनकोडने नुकतेच क्रीडाप्रेमींसाठी इंटरअॅक्टिव्‍ह डेटा ओव्‍हरलेज सारखी ग्राहक-केंद्रित वैशिष्‍ट्ये सादर केली, जेथे चाहते सामन्‍याचे थेट प्रेक्षपण पाहताना त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार डेटा सानुकूल करू शकतात; मॅच अॅण्‍ड टूर पासेस सादर करत विशिष्‍ट कन्‍टेन्‍ट सबस्‍क्राईब करण्‍याची सुविधा प्राप्‍त करू शकतात; आणि मल्‍टीमीडिया समालोचनासह क्रिकेट सामन्‍यांचे लाइव्‍ह स्‍कोअर्स जलदपणे प्राप्‍त करू शकतात. यामध्‍ये फॅन्‍टसी स्‍पोर्टस् युजर्ससाठी भारताच्‍या पहिल्‍या सानुकूल समालोचनाचा समावेश आहे. वर्ष २०१९ मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून फॅनकोडने सामन्‍याचे इंटरअॅक्टिव्‍ह लाइव्‍ह स्ट्रिमिंग, जगभरातील क्रीडाक्षेत्राबाबत बातम्‍या, सामन्‍याचे हायलाइट पॅकेजेस् सारखे लहान व्हिडिओ कन्‍टेन्‍ट, आधुनिक स्‍वरूपात क्रीडा व्‍यक्तिमत्त्वांसोबत गप्‍पागोष्‍टी आणि तज्ञांची मते सादर करत भारतीय चाहत्‍यांसाठी क्रीडा अनुभव वाढवला आहे.