जिओचा ८४ दिवसांचा जबरदस्त प्लॅन, जाणून घ्या

जिओ  कंपनी ८४ वैधता असलेले एकूण ३ प्लॅन जिओकडून ऑफर केले जात आहे. ५९९, ५५५ आणि ९९९ असे जिओचे तीन प्लॅन असून याची वैधता ८४ दिवसांची आहे.

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन आणला आहे. यामध्ये १ जीबी ते ३ जीबी डेटापर्यंत रोज विविध प्रकारचे प्लॅन मिळणार आहेत. तसेच रिलायन्स  जिओ  कंपनी ८४ वैधता असलेले एकूण ३ प्लॅन जिओकडून ऑफर केले जात आहेत. ५९९, ५५५ आणि ९९९ असे जिओचे तीन प्लॅन असून याची वैधता ८४ दिवसांची आहे. जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून या पॅकमध्ये दररोज ३ जीबी डेटा म्हणजेच २५२ जीबी डेटा मिळतो. त्यामुळे ग्राहकांना रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps होतो. तसेच १०० एसएमएस फ्री आणि याशिवाय जिओ  ॲप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

जिओचा ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा म्हणजे १६९ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच डेटाची लिमिट संपल्यानंतर 64Kbps स्पीडने इंटरनेट मिळते.जिओ अनलिमिटेड वरुन दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार मिनिट्स मिळणार आहेत. जिओच्या ५५५ रुपयांच्या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून या पॅकमध्ये रोज १.५ जीबी डेटा याप्रमाणे १२६ जीबी डेटा मिळणार आहे. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जिओच्या या पॅकमध्ये ३ हजार कॉलिंग मिळते. त्याचप्रमाणे जिओ ग्राहकांना १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.