If Biden is elected instead of Trump, will India-US relations remain the same?

मागीलवर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेत अमेरिकेने आघाडी घेतली होती. अमेरिकेचे स्थान यावर्षी सुध्दा कायम असल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणानुसार, जर्मनीने तिसरे स्थान कायम राखले आहे तर ब्रॅक्सिटनंतर 11 टक्के गुणांसह ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात भारत आठ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे.

    दिल्ली : अर्थव्यवस्थेबाबत जगभरातील सीईओंचे मत जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात भारत जगातील पाचवी आकर्षक अर्थव्यवस्था ठरली आहे. त्याचबरोबर ब्रिटनने (यूके) भारताला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. जागतिक सर्वेक्षणात अमेरिका (यूएस) पहिल्या आणि चीन दुसऱ्या स्थानावर आहे. पीडब्ल्यूसी कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने केलेल्या जागतिक सीईओ सर्वेक्षणात भारतासह 100 देशांतील 5,050 सीईओंचा समावेश होता.

    मागीलवर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेत अमेरिकेने आघाडी घेतली होती. अमेरिकेचे स्थान यावर्षी सुध्दा कायम असल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणानुसार, जर्मनीने तिसरे स्थान कायम राखले आहे तर ब्रॅक्सिटनंतर 11 टक्के गुणांसह ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात भारत आठ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे.

    जपानने सर्वोत्कृष्ट आर्थिक वाढीचे स्थान सुधारत आणि सहावे स्थान गाठून ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. पुढील 12 महिन्यांत, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता 35 टक्के सीईओंनी वर्तवली आहे. सर्वेक्षणात म्हटले आहे की जगातील 76 टक्के मुख्य कार्यकारी अधिकारी मानतात की 2021 मध्ये जागतिक आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल.