फ्लिपकार्टने जाहीर केली त्यांच्या ‘फ्लिपकार्ट लीप’ या पहिल्यावहिल्या स्टार्टअप चालना देणाऱ्या उपक्रमातील अंतिम फेरीची यादी

फ्लिपकार्ट लीपच्या माध्यमातून उदयोन्मुख स्टार्टअप्सचे संवर्धन करण्याचा आणि त्यांना ग्राहकांना योग्य पर्याय देण्यात आणि आपल्या क्षेत्रात मूल्यवर्धन करण्यात साह्य करणे हा आमचा उद्देश आहे

बेंगळुरु: फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने आज फ्लिपकार्ट लीप या त्यांच्या स्टार्टअप चालना उपक्रमातील अंतिम यादीची घोषणा केली. नव्या आणि उदयोन्मुख स्टार्टअप्सना वाढ करणे, व्याप्ती वाढवणे, आव्हानांचा सामाना करत भारताच्या वाढत्या उद्योजकता परिसंस्थेत सहभाग नोंदवण्यात साह्य करणे आणि त्यातून सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ मोहिमेला चालना देण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२० मध्ये कंपनीने हा उपक्रम सुरू केला. सखोल अशा चार पायऱ्यांमधील प्रक्रियेनंतर आठ अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. पाच विभागांतून ९२० हून अधिक स्पर्धक होते : डिझाइन अॅण्ड मेक फॉर इंडिया, इनोव्हेशन्स इन डिजिटल कॉमर्स, टेक्नॉलॉजीस टू एम्पॉवर रीटेल, एससीएम अॅण्ड लॉजिस्टिक आणि एनेबलिंग डीप टेक अॅप्लिकेशन्स. आठ निवडक कंपन्यांमध्ये एएनएस कॉमर्स, एंट्रोपिक टेक, फॅशिन्झा, गली नेटवर्क, पिगी, टॅगबॉक्स सोल्युशन्स, अनबॉक्स रोबोटिक्स आणि वोकस टेक्नॉलॉजीस.

अंतिम यादीतील या स्टार्टअप्ससाठी आता फ्लिटकार्टचे नेतृत्व आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून १६ आठवड्यांचा मेंटॉरशीप कार्यक्रम असणार आहे. दोन स्वतंत्र विभागांमध्ये निवडक स्टार्टअप्सना वेंचर डेव्हलपमेंट आणि सुरक्षित भागीदारीबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने या मेंटॉरशीप कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. पहिल्या विभागात वन-ऑन-वन बिझनेस आणि तांत्रिक मेंटॉरशीप, मास्टरक्लासेस आणि भारतात व्यापक प्रमाणावरील व्यवसायाची उभारणी करण्यासाठी योग्य पद्धतीने आणि साधनांच्या माध्यमातून वेंचर डेव्हलपमेंटवर भर देणाऱ्या नेटवर्किंग सत्राचा समावेश असेल. तर, दुसऱ्या ट्रॅकमध्ये स्टार्टअप्सना फ्लिपकार्टवरील सुयोग्य बिझनेस युनिट्ससोबत भागीदारी संधींचा वेध घेण्यात साह्य केले जाईल. त्याचप्रमाणे या अंतिम फेरीतील स्पर्धकांना प्रत्येकी २५००० डॉलर असा इक्विटीमुक्त निधीही दिला जाईल.

फ्लिपकार्टच्या प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी आणि डिप्लॉयमेंट विभागाचे उपाध्यक्ष नरेन रावुला म्हणाले, “फ्लिपकार्ट लीपच्या माध्यमातून उदयोन्मुख स्टार्टअप्सचे संवर्धन करण्याचा आणि त्यांना ग्राहकांना योग्य पर्याय देण्यात आणि आपल्या क्षेत्रात मूल्यवर्धन करण्यात साह्य करणे हा आमचा उद्देश आहे. आमच्याकडे आलेल्या स्टार्टअप्सचा दर्जा आणि अर्जांची संख्या फारच प्रोत्साहनपर होती. यातील आठ स्टार्टअप्ससोबत काम करून, त्यांचे मेंटॉरिंग करणे आणि उद्योगाचा अनुभव आणि धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून त्यांना साह्य करण्यास आता आम्ही उत्सुक आहोत.”

अंतिम स्पर्धकांबद्दल :
एएनएस कॉमर्स ऑनलाइन ब्रँड्ससाठीची ही संपूर्णपणे ई-कॉमर्स एनबेलर कंपनी आहे. ब्रँड स्टोअर टेक व्यासपीठ, परफॉर्मन्स मार्केटिंग, मार्केटप्लेस मॅनेजमेंट आणि ई-कॉमर्स वेअरहाऊसिंग आणि फुलफिलमेंट अशा सर्व प्रकारच्या सेवा ते पुरवतात. एंट्रोपिक टेक भारतातील पहिली इमोशन एआय कंपनी. उत्पादनाचा अनुभव, मीडिया कॅम्पेन्स आणि ब्रँड कंटेंट यासंदर्भात ग्राहकाचा आकलनविषयक आणि भावनिक प्रतिसाद जोखण्यात यांचे पेंटंट घेतलेले तंत्रज्ञान ब्रँड्सना साह्य करते. त्यामुळे ब्रँड्सना ग्राहकांचे वर्तन समजून घेत उत्कृष्ट अनुभव देणे शक्य होते.