फ्लिपकार्टने महाराष्ट्रात सुरू केले चार नवे फुलफिलमेंट आणि Sorting Centers

ही नवी केंद्रे भिवंडी आणि नागपूरमध्ये एकूण सुमारे सात लाख चौ. फुट जागेवर वसली आहेत. यातून ४००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीसोबतच राज्यात मागील वर्षात ३० टक्क्यांनी वाढलेल्या विक्रेत्यांच्या संख्येमुळे ही नवी केंद्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. फ्लिपकार्टकडे राज्यातील विक्रेत्यांची संख्या मोठी आहे आणि ती वेगाने वाढते आहे.

  • सुमारे ७ लाख चौ. फुट जागेवरील या नव्या केंद्रांत ४००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार
  • यातून हजारो स्थानिक विक्रेते/एमएसएमईजना भारतभरातील बाजारपेठ उपलब्ध होणार
  • नव्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे राज्यातील वाढत्या ई-कॉमर्स मागणीला साह्य होणार
  • वाढत्या विक्रेता परिसंस्थेला पाठबळ देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

मुंबई : फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने आज महाराष्ट्रातील तंत्रज्ञानाधारित पुरवठा साखळीला बळकटी देण्याची घोषणा केली. राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच ई-कॉमर्सच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी चार नवे फुलफिलमेंट आणि सॉर्टेशन सेंटर्स सुरू केले जाणार आहेत. या नव्या सुविधा म्हणजे राज्यातील ग्राहक आणि विक्रेत्यांना वेगवान आणि सहजसोप्या पद्धतीने सेवा देण्याच्या आणि त्यांच्या प्रगतीत हातभार लावत राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या फ्लिपकार्टच्या बांधिलकीचे प्रतिक आहे.

ही नवी केंद्रे भिवंडी आणि नागपूरमध्ये एकूण सुमारे सात लाख चौ. फुट जागेवर वसली आहेत. यातून ४००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीसोबतच राज्यात मागील वर्षात ३० टक्क्यांनी वाढलेल्या विक्रेत्यांच्या संख्येमुळे ही नवी केंद्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. फ्लिपकार्टकडे राज्यातील विक्रेत्यांची संख्या मोठी आहे आणि ती वेगाने वाढते आहे. होम डेकोरपासून मोबाइल आणि लगेजपासून ट्रॅव्हल ॲक्सेसरी अशा असंख्य गोष्टी देशभरातील ग्राहकांना विकल्या जात आहेत.

महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत आकर्षक गुंतवणूक स्थान आहे आणि फ्लिपकार्टने नुकतीच राज्यात केलेली गुंतवणूक स्वागतार्ह आहे. जागतिक महासंकटाच्या काळात लोकांना घरातच राहून त्यांच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यात साह्य करण्यात फ्लिपकार्टने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि फ्लिपकार्टच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी आणि विक्रेत्यांना, एमएसएमईज तसेच कारागिरांना पाठबळ मिळत आहे याचा मला आनंद आहे.

सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र

पुरवठा साखळीच्या अनुषंगाने देशभरात मालाचा पुरवठा सहजगत्या होण्याची खात्री होण्यात महाराष्ट्र हे फ्लिपकार्टसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. नुकतीच सुरू झालेली केंद्रे आणि आधीच्या केंद्रांना व्यापक केल्याने आता फ्लिपकार्टची महाराष्ट्रात १२ पुरवठा साखळी केंद्रे आहेत. २३ लाख चौ. फुटाहून अधिक जागेवरील या केंद्रांमध्ये २०००० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.

एक एतद्देशीय ई-कॉमर्स कंपनी म्हणून आम्ही सातत्याने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीत गुंतवणूक करत आहोत. यातून स्थानिक एमएसएमई, कारागिर, विणकर आणि इतर वंचित समुदायांच्या बळकट परिसंस्थेला पाठबळ मिळते. ग्राहकांच्या बदलत्या मागण्या लक्षात घेऊन आम्ही सातत्याने त्यांना अप्रतिम अनुभव देत राहू आणि त्याचवेळी राज्यातील स्थानिक विक्रेत्यांसाठी संधी आणि हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती करू. महाराष्ट्राशी आमचे फार जुने बंध आहेत आणि तंत्रज्ञान आणि नाविन्यतेच्या जोरावर उद्योगांचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेत ही भागीदारी अधिक दृढ करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

रजनीश कुमार, चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर, फ्लिपकार्ट

देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र नेहमीच लाखो नवे ग्राहक, विक्रेते आणि किराणा भागीदारांसह ई-कॉमर्सच्या प्रगतीला चालना देण्यात आघाडीवर आहे. यातून त्यांच्या गरजा भागवतानाच उद्योजकतेच्या संधीही निर्माण केल्या जातात. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, फ्लिपकार्टने महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSSIDC) आणि महाराष्ट्र स्टेट खादी ॲण्ड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड (MSKVIB) सोबत सामंजस्य करार केला. यातून राज्यातील स्थानिक कारागिर, विणकर, हस्तकला कारागिर आणि एसएमबीजना ई-कॉमर्सच्या परिघात आणले जाईल.

त्याचप्रमाणे, पश्चिमेकडील ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट ई-कॉमर्स अधिक सर्वसमावेशक बनवत आहे. ‘फ्लिपकार्ट ॲप’ ने हिंदी, मराठी आणि गुजराती भाषांसह ११ प्रमुख भारतीय भाषांमध्ये इंटरफेस उपलब्ध करून दिला आहे.