flipkart make announcement for big saving days sale get huge discount on mobile phone tv other accessories
आजपासून सुरू होतोय Flipkart चा Big Saving Days Sale मोबाइल, टीव्ही, लॅपटॉपसह या प्रोडक्ट्स वर 40-70% सूट

या सेल मध्ये तुम्हाला Samsung, Realme, Apple, Poco आणि Oppo सह काही ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या डिस्काऊंट मध्ये उपलब्ध होतील. तर जाणून घेऊया Big Saving Days Sale मध्ये आपल्याला कोणत्या फोनवर किती डिस्काऊंट मिळणार आहे.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट 18 डिसेंबर अर्थात आजपासून बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart big saving days sale) सुरू करणार आहे. Flipkart वर साल 2020 चा हा अखेरचा सेल 18 से 22 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. यात तुम्हाला मोबाइल, टीव्ही, कॅमरा, स्मार्टवॉच, लॅपटॉप, हेडफोन्स, ईयरफोन्स, ईयरबड्स, फिटनेस बँड, ट्रिमर, स्पीकर्स, पावर बँक, कंप्युटर वर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे.

या सेल मध्ये तुम्हाला Samsung, Realme, Apple, Poco आणि Oppo सह काही ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या डिस्काऊंट मध्ये उपलब्ध होतील. तर जाणून घेऊया Big Saving Days Sale मध्ये आपल्याला कोणत्या फोनवर किती डिस्काऊंट मिळणार आहे.

>> या सेल मध्ये आपल्याला रियलमी ( Realme 6i) जवळपास 12,999 रुपयांना खरेदी करता येईल.

>> यात आपल्याला रियलमीचा मॉडल Realme Narzo 20 Pro अंदाजे 13,999 रुपयांना विकत घेता येईल.

>> या सेल मध्ये आपल्याला रेडमीचा फेमस मोबाइल (Redmi 9i) अंदाजे 8,999 रुपयांना खरेदी करता येईल.

>> तर Poco X3, Poco M2, Poco M2 Pro, Poco X2 आणि Poco C3 वरही आपल्याला भरभक्कम सूट मिळणार आहे.

>> Apple iPhone XR आणि iPhone SE वरही सूट मिळेल. iPhone SE हा 32,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध होईल तसेच iPhone XR ही 38,999 रुपयांच्या प्राथमिक किंमतीला उपलब्ध होईल.

>> फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आपल्याला लॅपटॉप वर 40%, हेडफोन आणि स्पीकर वर 70% पर्यंत, स्मार्ट वेअरेबल्स वर 50% पर्यंत आणि टीव्हीवर 65% पर्यंतची सूट मिळणार आहे.

डिस्काऊंट व्यतिरिक्त कंपनीच्या आहेत अन्य ऑफर

फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल दरम्यान तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर खरेदीवर 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. या सेल दरम्यान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधाही मिळणार आहे.