फ्लिपकार्टने येत्या सणासुदीच्या काळासाठी आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला दिली बळकटी

  • १००,००० हून अधिक किराणा स्टोअर्स पुरवठा साखळीचे भागीदार बनून १०,००० हून अधिक पिनकोड्सवर लाखो पॅकेजेसची डिलिव्हरी करणार, या भागीदारीमुळे किराणा भागीदारांच्या उत्पन्नातही वाढ होईल

बंगळुरु : काही दिवसांवर आलेला उत्सवी काळ आणि बिग बिलियन डेजच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट या भारतातील एत्तदेशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने आज आपल्या ‘किराणा डिलिव्हरी प्रोग्राम’ला बळकटी देण्याची घोषणा केली. यामुळे, स्थानिक जनरल ट्रेड स्टोअर्सना डिलिव्हरी भागीदार म्हणून सहभागी होता येईल.

या उत्सवी काळात देशभरातील १००,००० हून अधिक किराणा भागीदारांसह फ्लिपकार्टने आपल्या किराणा डिलिव्हरी प्रोग्रामला बळकटी दिली आहे. आताच्या सणासुदीच्या काळात यामुळे लाखो शिपमेंटची डिलिव्हरी करणे शक्य होणार आहे. मागील वर्षी, सणासुदीच्या काळात देशभरातील खास प्रशिक्षण दिलेल्या किराणा भागीदारांनी १० दशलक्षांहून अधिक डिलिव्हरीज केल्या.

फ्लिपकार्टने २०१९ मध्ये स्थानिक स्टोअर्स आणि दुकानांना डिलिव्हरी पार्टनर म्हणून सहभागी करून घेण्यासाठी खास कार्यक्रमाची सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी डिलिव्हरीसाठी हे व्यावसायिक सज्ज व्हावेत यासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. फ्लिपकार्टकडे या भागीदारीचा भाग म्हणून एक खास टीम आहे. ही टीम किराणा दुकानदारांना माहिती, तज्ज्ञता, अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साह्य करत लाखो डिलिव्हरी सहज घडवून आणण्याला चालना देत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झालेल्या १००,००० हून अधिक किराणा डिलिव्हरी नेटवर्कच्या साह्याने फ्लिपकार्ट आपले लास्ट-माइल नेटवर्क आणि व्याप्ती अधिक बळकट करत आहे. ज्या शहरांमध्ये आणि पिन कोड क्रमांकावर सहज पोहोचता येत नाही अशा ठिकाणांवर भर देत आणि किराणा दुकानदारांसाठी डिजिटल अपस्किलिंग तसेच अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करत या व्यवसायाला बळकटी दिली जात आहे.

या सणासुदीच्या काळात खम्माम (तेलंगणा), बरेली (उत्तर प्रदेश) आणि जुनागढ (ओदिशा) अशा काही भागातूनही दुकानदार सहभागी होतील आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित आणि वेळेवर डिलिव्हरी देतील.

फ्लिपकार्टच्या पुरवठा साखळी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री म्हणाले, “विक्रेते, एमएसएमई, कारागीर, ग्राहक आणि किराणा दुकानदारांसह आपल्या सर्व भागधारकांसाठी योग्य मूल्य निर्माण करण्यास फ्लिपकार्ट बांधील आहे. भारतातील एक सगळ्यात जुना व्यवसाय म्हणून किराणा दुकानांनी भारतातील आधुनिक रिटेलसाठी भक्कम पाया तयार केला आहे आणि रिटेल व्यवसायाच्या या दोन्ही स्वरुपांचा सहज मेळ साधत ग्राहकांना अधिक आनंद मिळवून देण्याचा आणि त्यातून सर्वांसाठी मूल्यनिर्मिती करण्याचा फ्लिपकार्टचा प्रयत्न आहे. या दुकानदारांची हायपरलोकल उपस्थिती आणि फ्लिपकार्टचे नाविन्यपूर्ण मार्ग यांचा मेळ साधत किराणा डिलिव्हरी प्रोग्राम हा देशातील किराणा परिसंस्थेला बळकटी देणारा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात आणि बिग बिलियन डेज (बीबीडी) या आमच्या वार्षिक महोत्सवात ग्राहकांना वेगवान आणि पर्सनलाइज्ड डिलीव्हरी अनुभव देण्यात या उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा असेल आणि त्यामुळे किराणा भागीदारांचे उत्पन्नही वाढेल.”

मागील तीन वर्षांपासून किराणा डिलिव्हरी प्रोग्राममध्ये सातत्याने वाढ झाली आहे आणि आजघडीला फ्लिपकार्टच्या दरमहा डिलिव्हरीमधील एक तृतीयांश वाटा या विभागाचा आहे. यातून डिलिव्हरीचा वेग आणि व्याप्ती वाढली आहे आणि सोबतच किराणा भागीदारांचे उत्पन्नही. गेल्या वर्षभरातच आमच्या किराणा भागीदारांनी त्यांच्या डिलिव्हरीतील उत्पन्नामध्ये जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाल्याचा अनुभव घेतला आहे.

या सणासुदीच्या काळात किराणा दुकानदारांना यात सहभागी होऊन सक्रिय राहण्यात साह्य करण्यासाठी फ्लिपकार्टने काही महिन्यांपूर्वी संपर्करहित सहभाग प्रक्रियेच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी अर्ज जारी केले होते. किराणा दुकानदारांना आवश्यक कागदपत्रंसह त्यांची माहिती थेट भरून सहभागी होण्यासाठी यात आमंत्रित करण्यात आले होते. कागदपत्रांची योग्य शहानिशा केल्यानंतर किराणा भागीदारांना यात सहभागी करून घेत त्यांना खास तयार केलेल्या टेक्नॉलॉजी टुल्सच्या साह्याने प्रशिक्षण दिले गेले. यात ॲप-आधारित डॅशबोर्ड आणि डिजिटल पेमेंट्सचा समावेश होता.

लाखो विक्रेत्यांना साह्य करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित पुरवठा साखळी निर्माण करण्यात फ्लिपकार्टने बरीच मोठी गुंतवणूक केली आहे आणि ग्राहकांना अतुलनीय अनुभव देण्यात अग्रणी राहून ई-कॉमर्सची विश्वासार्हता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.