flipkart to host the big billion days sale from oct 16 21
फ्लिपकार्टच्या वार्षिक द बिग बिलियन डेजचे आगमन

  • १६ ते २१ ऑक्टोबर या सहा दिवसांच्या कालावधीत होणार सोहळा
  • लक्षावधी विक्रेते, कारागीर आणि ब्रँड्सच्या आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्सचा लाभ

बंगळुरू : फ्लिपकार्ट (flipcart) या भारतीय ई-कॉमर्स कंपनीने आपल्या वार्षिक द बिग बिलियन डेज (the big billion days) या प्रमुख सोहळ्याची घोषणा केली. १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सहा दिवसांच्या सोहळ्याने देशाच्या उत्सवपर्वाला प्रारंभ होत असून लक्षावधी ग्राहक, विक्रेते, कारागिर आणि ब्रँड सणासुदीच्या जल्लोषासाठी एकत्र येतात. जुन्या, तसेच नव्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण उत्पादने वाजवी दरात उपलब्ध करून देऊन पैशांचा पुरेपूर परतावा देण्याच्या आपल्या कटिबद्धतेवर या सोहळ्याच्या माध्यमातून फ्लिपकार्ट भर देत असून देशभरातील एमएसएमईज आणि विक्रेत्यांना विकासाच्या संधीही उपलब्ध करून देत आहे.

यंदाच्या बिग बिलियन डेज दरम्यान लक्षावधी विक्रेते आणि विविध श्रेणींतील हजारो ब्रँड्सच्या माध्यमातून दर तासाला आकर्षक ऑफर्सचा वर्षावर होणार आहे. शिवाय, फ्लिपकार्ट प्लसच्या ग्राहकांना १५ ऑक्टोबर रोजी ‘अर्ली ॲक्सेस’चा लाभ मिळणार आहे.

ग्राहकांना वित्त पुरवठ्याचे आकर्षक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून फ्लिपकार्टने यंदा आपल्या व्यासपीठावर रक्कम अदा करण्याचे नवे व सुलभ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे सर्वसमावेशक आणि ग्राहककेंद्री खरेदी अनुभव मिळण्याचा मार्ग प्रशस्त होईल. बिग बिलियन डेज दरम्यान खरेदी करणाऱ्या फ्लिपकार्टच्या ग्राहकांना एसबीआय डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून खरेदी केल्यास १० टक्के तात्काळ सवलतीचा लाभ मिळणार असून बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड्स आणि अन्य प्रमुख बँकांच्या क्रेडिट व डेबिट कार्ड्सच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीची रक्कम न भरता सुलभ हफ्त्यांचा (नो कॉस्ट ईएमआय) पर्याय उपलब्ध असेल.

पेटीएम वॉलेट आणि पेटीएम यूपीआयद्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना खात्रीशीर रोखपरतावा मिळावा, यासाठी फ्लिपकार्टने पेटीएमशी हातमिळवणी केली आहे. यामुळे सुलभ खरेदीच्या अनुभवात भर पडणार आहे. याखेरीज, ठराविक कार्ड्सवर डेबिट कार्ड ईएमआय (किमान जमा रकमेच्या अटीशिवाय) आणि फ्लिपकार्ट पे लेटर या पर्यायांच्या माध्यमातून ग्राहकांना वित्तपुरवठा होणे सुरूच राहाणार आहे.

बिग बिलियन डेजमुळे उत्साहाचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच देशात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विक्रेते, कारागिर आणि ब्रँड सज्ज होत असल्यामुळे यावर्षीच्या या सोहळ्यामुळे देशभरात ७० हजार थेट, तर लाखो अप्रत्यक्ष मौसमी रोजगार निर्माण होतील.

फ्लिपकार्टने गेल्या सहा महिन्यात हजारो नव्या विक्रेत्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर सहभागी करून घेतले असून विनामूल्य बिझनेस इन्क्युबेशन, प्रॉडक्ट कॉटलॉगिंग, जाहिरात आणि गतिमानतेसाठी इनसाइट्स आदी माध्यमातून या विक्रेत्यांचा ई कॉमर्स प्रवास सुलभ व सुखकर व्हावा, यासाठी त्यांना मदतही केली आहे. याव्यतिरिक्त कंपनीने असंख्य व्हर्च्युअल प्रशिक्षण व विकास सत्रांचे आयोजन करून विक्रेत्यांना फ्लिपकार्टचे प्रतिनिधी व तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करण्याची, तसेच सणासुदीच्या काळात ई कॉमर्सचा आपल्या व्यवसायासाठी अधिकाधिक लाभ करून घेण्याच्या दृष्टीने नेमके काय केले पाहिजे, हे समजून घेण्याची संधीही उपलब्ध करून दिली.

आपली पुरवठा साखळी अधिक बळकट करण्यासाठी फ्लिपकार्टने आपल्या किराणा सामिलीकरण कार्यक्रमाचा लक्षणीय विस्तार केला असून त्या माध्यमातून ५० हजारहून अधिक किराणांना सहभागी करून घेतले आहे. या माध्यमातून ८५० हून अधिक शहरांमधील ग्राहकांना अखेरच्या टप्प्यातील डिलिव्हरी केली जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक व्यक्तिगत स्वरुपाचा अनुभव देऊ शकेल आणि किराणा भागिदारांसाठीही अतिरिक्त उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध होईल.

मोबाइल, टीव्ही आणि घरगुती उपकरणे, ईलेक्ट्रॉनिक्स आणि पूरक उपकरणे, फॅशन, सौंदर्य प्रसाधने, फुड, खेळणी, बेबी केअर, होम अँड किचन, फर्निचर, ग्रोसरी आणि फ्लिपकार्टचे खासगी ब्रँड्स अशा विविध श्रेणीत लाखो विक्रेते व फ्लिपकार्ट समर्थ कारागिर, विणकर, हस्तकलाकारागिर आणि अन्य पिछाडीवरील समुदायांकडून आकर्षक सवलती उपलब्ध असणार आहेत.

ग्राहकांच्या गरजेनुसार तसेच आगळीवेगळी उत्पादने ग्राहकांपर्यंत घेऊन येण्यासाठी फ्लिपकार्टने विविध श्रेणींमध्ये आघाडीच्या लोकप्रिय ब्रँड्ससोबत धोरणात्मक भागिदारी केली असून त्यामुळे मेट्रो शहरांपासून चतुर्थ श्रेणीतील शहरांपर्यंतचे लाखो ग्राहक या बिग बिलियन डेज सोहळ्याची आतुरतेने वाट पाहातील. याखेरीज, यंदा ग्राहक फ्लिपकार्टच्या सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून २गुड या उपक्रमाद्वारे व्हिडिओ शॉपिंग अनुभवाचाही लाभ घेऊ शकतील, ज्याद्वारे लोकप्रिय व प्रसिद्ध व्यक्ती विद्यमान फॅशन ट्रेण्ड्स, गॅजेट्स, ब्यूटी व अन्य उत्पादनांशी निगडित सर्वोत्तम ऑफर्सची माहिती देतील.

बिग बिलियन डेज २०२० ची घोषणा करताना फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “बिग बिलियन डेज म्हणजे विविध ब्रँड्स, आजवर कधीही न पाहिलेली उत्पादने, सण आणि आनंद उत्साहाने साजरा करणारा जल्लोष असून सर्वजण उत्सवपर्वाच्या तयारीला लागत असल्यामुळे रोमांचकतेची भावनाही निर्माण होते. ई कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या पैशांचा पुरेपूर परतावा देणे, एमएसएमई आणि विक्रेत्यांना प्रगतीच्या नव्या संधी खुल्या करणे आणि रोजगार निर्मिती या फ्लिपकार्टच्या कटिबद्धतेवर या उत्सवपर्वातही भर देण्यात येणार आहे. ब्रँड्स आणि विक्रेत्यांसमवेतच्या मजबूत भागिदारीच्या माध्यमातून परस्परपूरक व्यवसाय आणि तंत्रज्ञानाची ताकद आम्ही एकत्र आणली असून त्यामुळे ग्राहकांना या उत्सवपर्वात घरबसल्या आकर्षक किमतीत वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध होऊ शकतील.”

अमिताभ बच्चन, विराट कोहली, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सुदीप किच्चा आणि महेश बाबू अशा आघाडीच्या लोकप्रिय सेलिब्रिटींसमवेत फ्लिपकार्ट काम करत असून बिग बिलियन डेड सोहळ्यात हे सेलिब्रिटी वैविध्यपूर्ण सर्जनशील भूमिकांमध्ये दिसतील. याखेरीज, ग्राहकांना या उत्सवी पर्वातील खरेदीदरम्यान सुपर कॉइन्सचा वापर करून अभूतपूर्व अशा ऑफर्ससाठी रिवॉर्ड्स पास मिळवता येईल आणि अतिरिक्त खरेदीवर दोन हजारापर्यंत बोनस कॉइन्सही जमवता येतील.

द बिग बिलियन डेजची वैशिष्ट्ये

१६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बिग बिलियन डेजला सुरुवात होणार असून फ्लिपकार्ट प्लसच्या ग्राहकांना अर्ली ॲक्सेसचा लाभ देणारा हा सोहळा २१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट व क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना १० टक्के तात्काळ सवलतीचा लाभ.

फ्लिपकार्ट प्लसच्या ग्राहकांना १५ ऑक्टोबर रोजी ‘अर्ली ॲक्सेस’चा लाभ.

बजाज फिनसर्व ईएमआय कार्ड्स आणि अन्य प्रमुख बँकांच्या क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआय.

पेटीएम वॉलेट आणि पेटीएम युपीआयद्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना खात्रीशीर रोख परतावा.

मोबाइल्स, टीव्ही, अप्लायन्सेस, फॅशन, ब्यूटी, होम अँड किचन, फर्निचर, ग्रोसरी व यांसारख्या अनेक श्रेणींमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेली आगळीवेगळी उत्पादने.

लाखे विक्रेते आणि फ्लिपकार्ट समर्थमधील कारागीर, विणकर व हस्तकला कारागिरांच्या माध्यमातून आकर्षक ऑफर्सचा वर्षाव

८५० हून अधिक शहरांमधील ग्राहकांना उत्सवाचा आनंद लुटता यावा, यासाठी ५०,००० किराणांचे फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर सामिलीकरण.

अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विराट कोहली, महेश बाबू आणि सुदीप किच्चा यांसारख्या सिनेमा व क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या तारकांसमवेत भागीदारी