प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

आपल्या देशात सगळ्यांनाच गुन्हेगारीच्या कथांचं एक आकर्षण आहे... प्रत्येक केसमधील अनाकलनीय स्वरूप, गुन्ह्याच्या स्थळांचा अभ्यास आणि डिटेक्टिव्ह व संशयी व्यक्तींमधील लपाछुपीचा खेळ. आपण डिटेक्टिव्हच्या आधीच पुढे गेलेलो असतो, टीव्हीचा पडदा भेदून खुन्याला पकडावं असं आपल्याला वाटत असतं!

आपल्या देशात सगळ्यांनाच गुन्हेगारीच्या कथांचं एक आकर्षण आहे… प्रत्येक केसमधील अनाकलनीय स्वरूप, गुन्ह्याच्या स्थळांचा अभ्यास आणि डिटेक्टिव्ह व संशयी व्यक्तींमधील लपाछुपीचा खेळ. आपण डिटेक्टिव्हच्या आधीच पुढे गेलेलो असतो, टीव्हीचा पडदा भेदून खुन्याला पकडावं असं आपल्याला वाटत असतं! मग खरंच पुढच्या वेळी अशी एखादी थरारक कथा पाहत असताना तुम्ही त्या सगळ्याचा भाग बनू शकलात तर? फ्लिपकार्ट व्हिडीओने गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेनमेंटसोबत सहकार्य करत तुमच्यासाठी अनोखी संधी आणली आहे. तुमच्या फोनवरून आरामात तुम्हाला डिटेक्टिव्हची भूमिका साकारता येणार आहे. कौन? हू डिड इट? या त्यांच्या नव्याकोऱ्या, अनोख्या क्राइम फिक्शन सीरिजमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. ‘पगलैत’ या आगामी सिनेमाचे दिग्दर्शक उमेश बिश्त या सिरीजचे शो रनर आहेत आणि ज्येष्ठ टीव्ही लेखक संजोय शेखर यांनी लेखन केले आहे.

या सीरिजमधील प्रत्येक एपिसोडमध्ये थरकाप उडवणारी खुनाची कथा असेल. यात प्रेक्षकांना डिटेक्टिव्ह बनवण्याची नामी संधी मिळेल आणि वेगवेगळ्या वळणांवर, अचूक दुवे पकडत योग्य वेळेत खुन्याचा शोध लावल्यास आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या सीरिजमध्ये बहुआयामी अभिनेता सुशांत सिंग दिसतील. वेगवेगळया व्यक्तिरेखा अत्यंत दमदारपणे साकारण्यासाठी ते ओळखले जातात. खासगी डिटेक्टिव्ह आणि माजी पोलिस अधिकारी आदीची भूमिका ते साकारणार आहेत. पोलिस खात्याविषयी असलेला तिरस्कार, जायबंदी पाय, आधाराची काठी या सगळ्यातून त्यांच्या भूतकाळाविषयी काही आडाखे सहज बांधता येतील. गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांच्यासोबत असणार आहे सिनेमा आणि नाटकातील अभिनेत्री संवेदना सुवालका म्हणजेच मालिनी. अत्यंत गुंतागुंतीचे हे गुन्हे उकलण्यात ती आदीमधील उत्तम डिटेक्टीव्ह कौशल्यांमुळे त्यांना साह्य करते.

फ्लिपकार्टचे उपाध्यक्ष (ग्रोथ अॅण्ड मॉनेटायझेशन) प्रकाश सिकारिया म्हणाले, “आमच्या ग्राहककेंद्री दृष्टिकोनामुळे नाविन्यतेत आम्ही नेहमी अग्रणी असतो. यामुळे आम्ही ठरलेली चाकोरी मोडत अधिक चांगला कंटेंट देतो. गुनीत आमच्यासाठी फार बहुमोल भागीदार आहेत. समान ध्येय आणि त्यांच्यातील सर्जनशीलता यामुळे दरवेळी आम्ही अधिक चांगलं काही देतो. ‘कौन? हू डिड इट?’ ची निर्मिती प्रेक्षकांमधील ‘गेसिंग’ करायला लावणाऱ्या कंटेंटची वाढती लोकप्रियता आणि गूढ उकलण्याची इच्छा यावर बेतली आहे. या शोमुळे अप्रतिम मनोरंजन मिळणार आहे आणि नायकाआधीच गूढ उकलण्याचा आनंदही. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यास आता आम्ही उत्सुक आहोत. या प्रकारात आम्ही नवनवीन संकल्पना राबवणार आहोत.”

फ्लिटकार्ट व्हिडीओसोबतची भागीदारी आणि या नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल सिख्या एंटरटेनमेंटच्या सीईओ गुनीत मोंगा म्हणाल्या, “कंटेंटच्या बाबतीत नेहमी अधिक काहीतरी करण्यावर सिख्यामध्ये आम्ही भर देतो आणि फ्लिपकार्टवरील हा नवा परस्परसंवादी शो या प्रयत्नातील एक आकर्षक वळण आहे. आम्ही लॉकडाऊनच्या काळात या शोची कल्पना मांडली, चित्रीकरण केले आणि सादरीकरणाचे काम पूर्ण केले. या वर्षी ही सिरीज प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. उमेश बिश्त (शो-रनर) आणि संजोय शेखर (लेखक) यांनी लॉकडाऊनच्या मर्यादांमध्येही अत्यंत अप्रतिम कंटेंट तयार केला आहे. यात क्राइम थ्रिलरकडून असलेल्या अपेक्षांना जराही धक्का लागलेला नाही. जिंदगी इनशॉर्टनंतर फ्लिपकार्ट व्हिडीओसोबत काम करताना मला आनंद होतोय. व्यापक प्रमाणावर फ्लिपकार्टची पोहोच असल्याने, तसेच त्यांना ग्राहकांच्या वर्तनाची जाण असल्याने या शो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मला आहे.”

ट्रेलरमधून प्रेक्षकांना या शोची कल्पना येईल. यात या दोन व्यक्तिरेखा काही कल्पनेपलिकडील गुन्ह्यांची उकल करत आहेत. वेगवान आणि गुंतवून ठेवणारी पटकथा असलेल्या या शोचे भाग दररोज फ्लिपकार्ट अॅपवर उपलब्ध होतील. या अनोख्या संकल्पनेमुळे हा शो तुमची पकड घेईलच, पण त्याचबरोबर नायकाच्या आधी खुन्याचा शोध लावल्यास तुम्हाला आकर्षक बक्षिसेही जिंकता येतील. कौन? हु डिड इट? सह फ्लिपकार्ट व्हिडीओ आणि सिख्या एंटरटेनमेंट प्रेक्षकांना थ्रिलरचा भाग बनवून त्या थ्रिलरचा अनुभव देणार आहेत… मग, तुम्ही कुठूनही ती कथा पाहण्यास सुरुवात केलीत तरी.हा शो ९ जानेवारीपासून फ्लिपकार्ट अॅपवर सुरू होत आहे. वापरकर्त्यांना फ्लिपकार्ट अॅपच्या होमपेजवर उजव्या बाजूला खाली असलेल्या व्हिडीओ आयकॉनवर क्लिक करून हा शो पाहता येईल.