Foreign investment boom continues; The highest inflow of foreign investment in India is from Singapore

कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांनी परकीय गुंतवणूकदार आश्वस्त झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी लॉकडाउनमध्ये देखील भारतात गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला आहे. यामुळे सरकारला मात्र सुखद दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षात भारतात परकीय गुंतवणूक 19 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षात भारतात एकूण 59.64 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे.

  दिल्ली : कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांनी परकीय गुंतवणूकदार आश्वस्त झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी लॉकडाउनमध्ये देखील भारतात गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला आहे. यामुळे सरकारला मात्र सुखद दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षात भारतात परकीय गुंतवणूक 19 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षात भारतात एकूण 59.64 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे.

  10 टक्क्यांची विक्रमी वाढ

  एफडीआयमधील एकूण ढोबळ गुंतवणूक 10 टक्क्यांनी वाढली असून विक्रमी पातळीवर गेली आहे. 2020-21 मध्ये एफडीआय 81.72 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. तर इक्विटीमध्ये थेट परकीय गुंतवणूक 19 टक्क्यांनी वाढली आहे. 2019-20 मध्ये 49.98 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. 2020-31 मध्ये त्यात 19 टक्के वाढ झाली आणि एकूण 59.64 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली.

  सिंगापूरमधील सर्वाधिक ओघ

  भारतात परकीय गुंतवणुकीचा सर्वाधिक ओघ सिंगापूरमधून आला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील एकूण गुंतवणुकीत सिंगापूरचा 29 टक्के वाटा आहे. तर त्याखालोखाल अमेरिका 23 टक्के आणि मॉरिशस 9 टक्के गुंतवणूक झाली आहे. परकीय गुंतवणूक धोरणातील सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि विविध उपाय योजना यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास कायम असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

  जागतिक पातळीवर बड्या गुंतवणूकदारांच्या पसंतीमध्ये भारत हा आघाडीचा देश आहे. गेल्या वर्षभरात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात सर्वाधिक 44 टक्के गुंतवणूक झाली आहे. त्याखालोखाल पायाभूत सेवा क्षेत्रात 13 टक्के आणि सेवा क्षेत्रात 8 टक्के गुंतवणूक झाली. 2020-21 मध्ये झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी गुजरातेत 37 टक्के गुंतवणूक झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 27 टक्के आणि कर्नाटकात 13 टक्के गुंतवणूक झाली.