Furniture centers across the country serve millions of customers through Flipkart on the backdrop of the festivities
उत्सवपर्वाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टच्या माध्यमातून देशभरातील फर्निचरची केंद्रे लाखो ग्राहकांच्या सेवेत

उत्सवपर्व आणि बिग बिलियन डेजच्या (big billion days) पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट (flipcart) या एतद्देशीय ई कॉमर्स (e commerce) बाजारपेठेने देशभरातील विविध फर्निचर (furniture) केंद्रांमधील (क्लस्टर्स) असंख्य सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपातील विक्रेत्यांना लक्षावधी ग्राहकांशी जोडण्यासाठी त्यांचे फ्लिपकार्टवर सामिलीकरण केले आहे.

  • चुरू (राजस्थान), सहारणपूर (उत्तर प्रदेश) आदी ठिकाणांचा समावेश
  • सूक्ष्म, लहान आणि मध्यम स्वरुपाचे फर्निचर निर्माते फ्लिपकार्टच्या माध्यमातून करणार विक्री

बंगळुरू : उत्सवपर्व आणि बिग बिलियन डेजच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट या एतद्देशीय ई कॉमर्स बाजारपेठेने देशभरातील विविध फर्निचर केंद्रांमधील (क्लस्टर्स) असंख्य सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपातील विक्रेत्यांना लक्षावधी ग्राहकांशी जोडण्यासाठी त्यांचे फ्लिपकार्टवर सामिलीकरण केले आहे. चुरू (राजस्थान), सहारणपूर (उत्तर प्रदेश), जबलपूर व इंदौर (मध्य प्रदेश) आणि सूरत (गुजरात) ही वानगी दाखल काही फर्निचर केंद्रांची नावे असून लाकूड, धातू आणि प्लास्टिकपासून बनवलेली फर्निचर ही त्यांची खासियत आहे.

या प्रक्रियेचा भाग म्हणून फ्लिपकार्टने या विक्रेत्यांना आपल्या विस्तृत पुरवठा साखळीशी जोडून घेऊन त्यांना देशव्यापी ग्राहकवर्ग उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व केंद्रांमध्ये छोटे पिक अप हब्ज स्थापन केले आहेत. यापैकी बहुसंख्य विक्रेते अत्यंत लहान प्रमाणात व स्थानिक पातळीवर कार्यरत असल्यामुळे अधिक ग्राहकसंख्येला सेवा पुरवण्याची त्यांची क्षमता मर्यादित असून व्यवसायाचे मर्यादित ज्ञान आणि मर्यादित व्याप्ती यामुळे क्लस्टरच्या बाहेर विस्तार करण्यावर त्यांना बंधने येतात.

फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर सहभागी झाल्यामुळे त्यांना फ्लिपकार्टकडून मिळणारे पाठबळ, तांत्रिक ज्ञान, ग्राहकांबाबतची सखोल माहिती आणि बाजारपेठेशी निगडित विविध साधने यांचा वापर करून व्यवसायातील सातत्य आणि विस्ताराच्या संधी यांचा लाभ घेता येईल.

फ्लिपकार्टच्या बीजीएमएच आणि फर्निचर विभागाचे, सीनियर डायरेक्टर, निशांत गुप्ता म्हणाले, “अस्सल व देशी बनावटीच्या फर्निचर निर्मिती व विक्रीच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारी अनेक फर्निचर क्लस्टर्स देशभरात विखुरलेली आहेत. मात्र, व्यापक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यात मर्यादा असल्यामुळे त्यांना अधिक मोठ्या संख्येने ग्राहकवर्गाला सेवा पुरवता येत नाही. भारतातील एतद्देशीय ई कॉमर्स बाजारपेठ या नात्याने या विक्रेत्यांना देशभरातील आमच्या लक्षावधी ग्राहकांशी जोडून त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यास मदत करणे हा आमचा प्रयत्न आहे. उत्सव पर्व आणि बिग बिलियन डेजच्या पार्श्वभूमीवर ते फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर सहभागी झाल्यामुळे कोविड महामारीच्या साथीमुळे विपरित परिणाम झालेल्या त्यांच्या व्यवसायालाही पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल.

घरून काम करण्याचे, तसेच शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे विविध श्रेणींमधील फर्निचरना वाढती मागणी असल्याचा अनुभव ऑनलाइन फर्निचर उद्योगाला येत असून हे विक्रेते फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर सहभागी झाल्यामुळे या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याबरोबरच ग्राहकांना उत्तम दर्जाचे व किफायतशीर किमतीतील फर्निचर उपलब्ध करून देण्यासही मदत होईल. ही मागणी हळूहळू दिवाणखाना व बेडरूममधील फर्निचर श्रेणीतही पसरत असून त्यामुळे या विक्रेत्यांसाठी व्यवसायाच्या उत्तम संधी आहेत.

फ्लिपकार्टवर सध्या फर्निचरची साडेतीन लाखांहून अधिक उत्पादने असून देशभरातील १०० टक्के सेवाक्षम पिनकोड्सवर त्यांची डिलिव्हरी करण्यात येते, तर नऊ हजारहून अधिक प्रमुख पिनकोड्सवर इन्स्टॉलेशन सेवाही पुरवली जाते. फर्निचर क्लस्टर्समधील विक्रेत्यांच्या या सामिलीकरणामुळे ग्राहकांना निवडीला अधिक वाव मिळेल. फ्लिपकार्ट पे लेटर, नो कॉस्ट ईएमआय आणि डेबिट कार्ड ईएमआय यांसारख्या पेमेंट पर्यायांमुळे देखील फर्निचर खरेदी करणे सुलभ व किफायतशीर झाले आहे.

सरकारने दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या हाकेला बळकटी देणारे हे पाऊल असून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाच्या विक्रेत्यांना पाठबळ देणे हे फ्लिपकार्टचे उद्दिष्ट आहे. स्थानिक उत्पादन क्षमतेला बळकटी देण्यासाठी सरकारने ज्या १० क्षेत्रांवर भर देण्याचे जाहीर केले आहे, त्यात फर्निचर क्षेत्राचा देखील समावेश आहे.