
व्यक्तीने दान केलेली मदत एनजीओ पार्टनरच्या खात्यात थेट जमा होईल. त्याशिवाय, मदत निधीच्या रुपात जमा होणाऱ्या रकमेएवढी आर्थिक मदत फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी दुप्पट रक्कम जमा होईल.
मुंबई: फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) ने ‘रूम टू रीड’ एनजीओच्या साथीने समाजातील दुर्बल घटकांतील बालकांमध्ये साक्षरतेचे बीज रुजावे आणि त्यांना वाचनाची सवय लागावी यासाठी मदत उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. या भागीदारीच्या माध्यमातून समाजातील आर्थिक-सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांसाठी ग्रंथालये उभारण्याचा तसेच त्याकरिता पुस्तके दान करण्याची योजना आखली आहे.
समाजातील मागासलेल्या घटकांचा विकास लक्षात घेऊन एफजीआयआयकडून हे जबाबदारीचे पाऊल उचलण्यात आले. या एनजीओचे पाठबळ असलेल्या शाळांकरिता निधी उभारण्याच्या दृष्टीने एफजीआयआयने अनोखा वार्षिक अहवाल तयार केला. Amazon.in आणि Flipkart.comवरून पुस्तकांची ऑर्डर देऊन आपले योगदान एखाद्याला या उपक्रमात देता येईल. व्यक्तीने दान केलेली मदत एनजीओ पार्टनरच्या खात्यात थेट जमा होईल. त्याशिवाय, मदत निधीच्या रुपात जमा होणाऱ्या रकमेएवढी आर्थिक मदत फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी दुप्पट रक्कम जमा होईल.
आपली कल्पक उत्पादने आणि सहानुभूतीपूर्ण व्यवहारासाठी एफजीआयआय ओळखली जाते. सध्या सुरू असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत या उपक्रमात सहभाग नोंदवून विविध आघाड्यांवर अतुलनीय निकाल दिल्याबद्दल आम्ही आमच्या लोकांचे अभिनंदन करतो. त्यांची जिद्द आणि मेहनत सुपर हिरोच्या पातळीची आहे. आपण समाजाप्रती कृतज्ञ भाव या निमित्ताने जोपासता आला. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी ‘खास’ असून मनाला साद घालणारा आहे.एखाद्या लहानशा कृतीतून समाजातील बालकांच्या आयुष्यात जीवन मूल्ये रुजतील ही आशा आम्हाला वाटते.
अनुप राऊ, एमडी आणि सीईओ, फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स