13% वाढणार जीडीपी ; कोरोनामुळे 24.4% झाली होती घट

अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच देशात आर्थिक गाडी रुळावर येऊ लागली. तथापि या कालावधीत अनेक सेक्टर्समधील कामकाज बाधितच झाले होते. याशिवया कामगारांच्या कमतरतेमुळे बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात वाढ झाली नव्हती.

  नवराष्ट्र न्यूज नेटवर्क , दिल्ली.

  कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. भारतही यास अपवाद नाही. त्यामुळेच चालू वर्षाच्या पहिल्या तोन तिमाहीत देशाचे सकल उत्पादन म्हणजेच जीडीपी नकारात्मक राहिले. तथापि अनलॉकनंतर व्यावसायिकेला वेग आल्यानंतर तिसरी तिमाही म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यातील तिमाहीत जीडीपीच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली. जीडीपीची गणना 8 सेक्टर्सच्या आधारावर केली जाते.

  पहिल्या तिमाहीतच फटका

  • कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने 25 मार्च 2020 रोजी देशभरात लॉकडाऊन केले होते.
  • आवश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहतूक आणि आर्थिक व्यवसायांवर निर्बंध लादले होते.
  • आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीत 23.9 टक्के घट झाली होती. तथापि ही आकडी प्रारंभिक होती. त्यानंतर सरकारने त्यात सुधारणा करीत ती -24.4% केली होती.
  • पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्रातच वाढ नोंदविण्यात आली होती.

  जुलै-सप्टेंबरमध्ये सुधारणा

  अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच देशात आर्थिक गाडी रुळावर येऊ लागली. तथापि या कालावधीत अनेक सेक्टर्समधील कामकाज बाधितच झाले होते. याशिवया कामगारांच्या कमतरतेमुळे बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात वाढ झाली नव्हती. जुलै – सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपीतील घट कमी झाली आणि ती -7.3% नोंदविण्यात आली होती.

  तिसऱ्या तिमाहीत सकारात्मक

  ऑक्टोबरपासून अधिकांश आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. लॉकडाऊनच्या काळात घरी परतलेले मजूरही शहराकडे वळू लागले. यामुळे बांधकाम, उत्पादन, निर्मतिीसह अधिकांश सेक्टर्समध्ये हालचालींना वेग आला होता. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर सकारात्मक झाला आणि तो 0.4 टक्क्यांवर आला.

  वर्षभरात 8% वाढ होण्याचा अंदाज

  एखाद्या देशाची अर्थव्यवस्था लागोपाठ दोन तिमाहीत नकारात्मक असेल तर त्यास तांत्रिक मंदी संबोधले जाते. परंतु तिसऱ्या तिमाहीत सकारात्मक विकासदर वाढीसह अर्थव्यवस्था तांत्रिक मंदीतून बाहेर आली होती. लॉकडाऊनचा विपरित परिणाम आर्थिक वर्ष 2019-20 मधील जानेवारी-मार्चच्या तिमाहीवर झाला होता. या तिमाहीत जीडीपी ग्रोथ 3.1% होती. सरकारेन संपूर्ण आर्थिक वर्षात विकासदरवाढीचा वेग 8% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे मूडीजने तर जीडीपीचा दर 12% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

  GDP

  पहिल्या तीन तिमाहीतील स्थिती

  24. 4% पहिली
  7. 3% दुसरी
  0. 4% तिसरी