500 रुपयाच्या जुन्या नोटेच्या बदल्यात मिळवा 10000 रुपये, वाचा नेमकी काय आहे प्रक्रिया

जर आरबीआयकडून (Reserve Bank of India) एखादी नोट जारी केली तर ती विशिष्ट सावधातना बाळगून छापली जाते. त्याचा पॅटर्न फिक्स असतो आणि त्यानुसार नोटा छापल्या जातात. यामुळे या नोटा एकसारख्या दिसतात, मात्र छपाईच्या वेळी एखादी चूक झाली आणि ती नोट बाजारात गेली तर ती नोट खास होते.

    नवी दिल्ली : तुमच्याकडे आजही 500 रुपयाची जुनी नोट (500 Rupees Old Note) असेल तर तुम्ही काहीही न करता 10,000 रुपये (Earn Money) कमावू शकता. ही 500 रुपयांची नोट जुनी आणि दुर्मिळ (Rare Indian currency) आहे, त्यामुळे याची किंमत हजारोंच्या घरात जाऊ शकते.

    का किंमती आहे ही नोट?

    जर आरबीआयकडून (Reserve Bank of India) एखादी नोट जारी केली तर ती विशिष्ट सावधातना बाळगून छापली जाते. त्याचा पॅटर्न फिक्स असतो आणि त्यानुसार नोटा छापल्या जातात. यामुळे या नोटा एकसारख्या दिसतात, मात्र छपाईच्या वेळी एखादी चूक झाली आणि ती नोट बाजारात गेली तर ती नोट खास होते. लोकं या नोटा काही पटींनी किंमत देऊन खरेदी करण्यासाठी तयार होतात. नोटबंदीनंतर जुनी 500 ची नोट आता दुर्मिळ कॅटेगरीमध्ये आली आहे.

    खरी किंमत तपासा

    तुमच्याकडे पाचशे रुपयांची जुनी नोट असेल तर ताबडतोब तपासा की त्याचा सीरियल क्रमांक दोनदा छापलेला नाही. तसे असल्यास तुम्हाला या नोटचे 5000 रुपये मिळू शकतात. या व्यतिरिक्त, जर 500 रुपयांच्या नोटेची एक कोपरा मोठा असेल, म्हणजे त्याकरता अतिरिक्त कागद वापरला असेल तर त्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 10,000 रुपये मिळू शकतात. 500 रुपयांच्या जुन्या नोटा तुम्हाला चांगली रक्कम मिळवून देऊ शकतात. पण यात काही अटी आहेत. यासाठी सर्वोत्तम दर तपासण्यासाठी तुम्हाला एका वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

    कुठे विकता येईल ही नोट?

    अशाप्रकारची खास नोट विकण्यासाठी तुम्हाला oldindiancoins.com या वेबसाइटवर जावे लागेल. याकरता सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो या प्लॅटफॉर्मवर अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुमची जाहिरात पाहून तुम्हाला वेबासाइट मार्फत संपर्क केला जाईल, तुम्ही त्यांच्याशी बोलणं करून नोटेची विक्री करू शकता.

    get 10000 rupees in exchange of rupees 500 old note know the detail