Godrej Expert Hair Color

म्पूवर आधारीत हेअर कलर बाजारपेठेची लक्षणीय वाढ झाली आहे. या बाजारपेठेचे सध्याचे मूल्य ३३० कोटी इतके आहे, वार्षिक ६१ टक्के इतक्या सरासरी वार्षिक दराने ती वाढत आहे. वेळ कमी असलेल्या ग्राहकांसाठी ही उत्पादने योग्य व सुलभ ठरत असल्याने बाजारात नव्याने सादर झाल्यावर सुरुवातीच्या काळात ग्राहकांनी या हेअर कलरना मोठा प्रतिसाद दिला.

मुंबई : भारतातील ५ कोटी घरांमध्ये विश्वासाने वापरला जाणारा व सर्वाधिक विक्री (bestselling ) होणारा हेअर कलर ब्रॅंड ( hair color brand) , ‘गोदरेज एक्स्पर्ट’तर्फे, (Godrej Expert ) हेअर कलरच्या ( hair color) बाजारपेठेत क्रांतीकारक ठरणारा ‘गोदरेज एक्स्पर्ट इझी’ हा शाम्पूवर आधारीत हेअर कलर सादर करण्यात आला आहे. केवळ २९ रुपये किंमतीचा ‘गोदरेज एक्स्पर्ट इझी’ हा केस रंगवण्याचा आधुनिक व सुटसुटीत मार्ग आहे. शाम्पूप्रमाणे हा हेअर कलर कोरड्या केसांवर लावल्यावर ५मिनिटांतच केस रंगण्याची प्रक्रिया पूर्ण होते. आवळा व शिकेकाई या दोन नैसर्गिक घटकांनी हा कलर समृद्ध आहे. हे नाविन्यपूर्ण उत्पादन या ब्रँडचा चकाकता तारा ठरले आहे. सर्व वापरकर्त्यांचा हा आवडता हेअर कलर बनला आहे.

गेल्या ४ वर्षांत, शाम्पूवर आधारीत हेअर कलर बाजारपेठेची लक्षणीय वाढ झाली आहे. या बाजारपेठेचे सध्याचे मूल्य ३३० कोटी इतके आहे, वार्षिक ६१ टक्के इतक्या सरासरी वार्षिक दराने ती वाढत आहे. वेळ कमी असलेल्या ग्राहकांसाठी ही उत्पादने योग्य व सुलभ ठरत असल्याने बाजारात नव्याने सादर झाल्यावर सुरुवातीच्या काळात ग्राहकांनी या हेअर कलरना मोठा प्रतिसाद दिला.

आता बहुसंख्य नागरिक घरातूनच काम करीत असल्याने व घराबाहेर जाण्याचा प्रसंगच कमी झाल्याने, शाम्पू-आधारीत हेअर कलर्सना जास्त मागणी आहे. शाम्पूप्रमाणेच, ‘गोदरेज एक्स्पर्ट इझी’ हे केसांवर ग्लोव्हज घातलेल्या हातांनी लावता येते. त्यामुळे डोक्याच्या मागील भागावरही ते सहजपणे बसू शकते. यासाठी बाऊल किंवा ब्रश वापरण्याची गरज नाही. कोणाच्याही मदतीशिवाय, वापरकर्त्याला स्वतःच ‘गोदरेज एक्सपर्ट इझी’ने आपले केस रंगविता येतात. नॅचरल ब्लॅक, नॅचरल ब्राऊन आणि बरगंडी या तीन रंगांमध्ये गोदरेज एक्सपर्ट इझी उपलब्ध आहे.

‘गोदरेज एक्सपर्ट इझी’विषयी बोलताना ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि.’चे भारत व सार्क विभागासाठीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘’गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (Products) ही सध्या भारतातील सर्वात मोठी हेअर कलर कंपनी आहे. प्रत्येक भारतीयाला केस रंगविण्यातील आपला पहिला अनुभव ‘गोदरेज एक्स्पर्ट’ ब्रॅंडकडून मिळावा, असे आमचे उद्दीष्ट आहे. ४८७६ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या व ६.६ टक्के दराने वाढत असलेल्या हेअर कलर क्षेत्रात, ‘गोदरेज एक्सपर्ट इझी’ शाम्पू हेअर कलर हे नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. वेळेची कमतरता असलेल्या आणि केस त्वरीत रंगविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे आमचे विशेष उत्पादन आम्ही सादर करीत आहोत. केस रंगविण्याची संपूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आणि ५ मिनिटांत पूर्ण होण्यासारखी असल्यानेच ‘गोदरेज एक्सपर्ट इझी’ हे उत्पादन नाविन्यपूर्ण ठरते. आगामी सणासुदीच्या काळात या शाम्पू आधारीत हेअर कलरला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी आम्हाला आशा आहे.’’

गोदरेज कंपनीच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून ‘गोदरेज एक्सपर्ट इझी शाम्पू हेअर कलर’ला ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात मिळेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे. विशेषतः आगामी उत्सव काळात प्रत्येकजण आपल्या दिसण्याविषयी जागरूक झालेला असताना, शाम्पू आधारीत हेअर कलरला मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.