gold

गेल्या ११ महिन्यांतील सोन्याचे दर निचांकी स्तरावर गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दरात घट झाली होती. परंतु देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना बेरोजगारीचा फटका देखील बसला होता. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरले होते. ऑगस्ट महिन्यात ५६ हजार २०० रूपये प्रति तोळा सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. या स्तरावरून आतापर्यंत सोन्याच्या दरात १२ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते. आज (मंगळवार) सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असून २२ कॅरेट सोन्याचे भाव १६० रूपयांनी वाढून ४३ हजार ६८० रूपये प्रतितोळा इतके झाले आहेत. तर एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव ४४ हजार ३६० रूपये प्रतितोळा झाला आहे. तर चांदीचे दर पाहिले असता, ०.५ टक्क्यांनी वाढून ६६ हजार २०२ प्रतिकिलो इतके झाले आहेत.

    गेल्या ११ महिन्यांतील सोन्याचे दर निचांकी स्तरावर गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दरात घट झाली होती. परंतु देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना बेरोजगारीचा फटका देखील बसला होता. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरले होते. ऑगस्ट महिन्यात ५६ हजार २०० रूपये प्रति तोळा सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. या स्तरावरून आतापर्यंत सोन्याच्या दरात १२ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

    राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये काय आहे सोन्याचा दर?

    राजधानी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर वाढून ४४ हजार १५० रूपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर सोमवारी हेच दर ४३ हजार ८६० रूपये प्रतितोळा इतके होते. मुंबईमध्ये सोन्याचे दर ४३ हजार ६८० रूपये प्रतितोळा इतके आहेत. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ४४ हजार १२० रूपये प्रतितोळा इतके आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचे भाव ४२ हजार २१० रूपये प्रतितोळा तर २४ कॅरेट सोन्याचे दर ४६ हजार ५० रूपये प्रतितोळा आहे. दरम्यान, एक्साईज ड्यूटी आणि सेसमुळे देशाच्या विविध भागात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत.