प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गेल्या काही दिवसांपासून घसरणारे सोनं आणि चांदीचे भाव वधारायला आता सुरुवात झालीय. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४५ हजार २१ रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा भाव गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ६७ हजार २२६ रुपये होता. आठवडा संपताना हा भाव बंद झाला ६७ हजार ५२७ रुपयांवर. गेल्या वर्षाच्या अखेरपासून सुरू असणाऱ्या सोनं आणि चांदीच्या भावात आता वाढ व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र त्यामुळं दिसलं. 

    सोनं आणि चांदी हा नेहमीच भारतीयांच्या आकर्षणाचा विषय राहिलाय. दागिन्यांची हौस म्हणून असो किंवा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असो, सोनं आणि चांदीला भारतात जोरदार मागणी असते. त्यामुळे सोन्याच्या भावातील चढउतारांकडं सामान्य माणसाचं बारीक लक्ष असतं.

    गेल्या काही दिवसांपासून घसरणारे सोनं आणि चांदीचे भाव वधारायला आता सुरुवात झालीय. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४५ हजार २१ रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा भाव गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ६७ हजार २२६ रुपये होता. आठवडा संपताना हा भाव बंद झाला ६७ हजार ५२७ रुपयांवर. गेल्या वर्षाच्या अखेरपासून सुरू असणाऱ्या सोनं आणि चांदीच्या भावात आता वाढ व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र त्यामुळं दिसलं.

    जगातील अनेक देशांमध्ये सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. त्यामुळं गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. २०२० मध्ये सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते. सोन्यानं नोंदवलेल्या उच्चांकापासून सोन्याचे भाव प्रति तोळा तब्बल १० हजार रुपयांनी कमी झाल्याचं चित्र गेल्या आठवड्यात दिसलं होतं. तर चांदीची किंमतदेखील गेल्या वर्षीच्या उच्चांकापेक्षा प्रति किलो १० हजार रुपयांनी कमी झाली होती.

    भविष्यात सोनं आणि चांदी यांची मागणी वाढणार असल्यामुळं गुंतवणुकीसाठी हा उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जातं. आतापर्यंत सोन्याचे आणि चांदीचे भाव सातत्यानं वाढत आले आहेत. चढ आणि उतार हा बाजाराचा नियम असला, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता सोन्याचांदीचे भाव हे वाढतच राहणार असल्याचं गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.