सोने – चांदीचा वाढला भाव, जाणून घ्या आजचा दर

सोन्याचा आजचा भाव ४७ हजार २२७ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव २४० रुपयांनी वाढला आहे.

    मुंबई :सोने आणि चांदीच्या दरामध्ये(Gold And Silver Prize) वाढ झाली आहे. सोन्याच्या आजच्या भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव ४७ हजार २२७ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव २४० रुपयांनी वाढला आहे.

    दिल्लीतील आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार १६० रुपये झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार १६० रुपये झाला आहे. चेन्नईतील सोन्याचा भाव पाहिला तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४४ हजार ६५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार ७१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४६ हजार १६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार १६० रुपये आहे.

    आज मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार २०० रुपये आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७ हजार २०० रुपये आहे.

    एमसीएक्सवर दुपारी १२ वाजता ऑगस्टमध्ये डिलिव्हरीवालं सोनं ०.४० टक्के तेजीनुसार ४७ हजार २२७ रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. तर ऑक्टोबर डिलिव्हरीवालं सोनं यावेळी १७९ रुपयांच्या तेजीसह ४७ हजार ५०० रुपये स्तरावर पोहोचला आहे. तर डिसेंबर डिलिव्हरी वाला सोना ३६४ रुपये घसरुन ४७ हजार २२९ रुपये प्रति तोळा ट्रेड करत आहे.