gold

सोन्याच्या दरात (Gold Rates Today) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या वाढीनंतर ही घसरण पाहायला मिळाली आहे.

    तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर आता ही चांगली संधी आहे. कारण सोन्याच्या दरात (Gold Rates Today) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या वाढीनंतर ही घसरण पाहायला मिळाली आहे.

    मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange) वर सोन्याचे दर आज पुन्हा कमी झाले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर ०.५% नी कमी होऊन वाढून ४६,७०४ रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर ०.२४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदीची किंमत (Silver Price) ६८,४७० प्रति किलोग्राम झाले आहेत.ऑगस्ट २०० मध्ये सोन्याचे दर ५६२०० रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते.

    त्यानंतर आतापर्यंत सोन्याचे दर १०००० रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर ६१ रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

    सोन्याचे नवे दर- दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे भाव ०.५ टक्केने कमी होऊन ४६,७०४ रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गेल्या आठ महिन्यातील कमी स्तरावर सोन्याचे दर आहेत. काल सोन्याचे दर काहीसे वधारले होते.

    चांदीचे नवे दर- दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. ०.२४ टक्क्यांच्या या घसरणीनंतर चांदीचे दर ६८,४७० प्रति किलोग्रामवर पोहोचले आहेत.