आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची वाढली किंमत, जाणून घ्या आजचा दर

एमसीएक्सवरील १० ग्रॅम जून वायदा सोन्याच्या किंमतीत (Gold rate) ०.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मे वायद्याच्या चांदीच्या (Silver Rate) एक किलोच्या किंमतीत ०.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate Today) वाढ झाली आहे. एमसीएक्सवरील १० ग्रॅम जून वायदा सोन्याच्या किंमतीत (Gold rate) ०.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मे वायद्याच्या चांदीच्या (Silver Rate) एक किलोच्या किंमतीत ०.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर जून वायदा सोन्याच्या किंमती २७० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४७,००७ रुपयांवर व्यापार करत आहे. स्पॉट गोल्ड प्रति औंस १७७०.६ डॉलरवर व्यापार करत आहे.

  एमसीएक्सवरील चांदीचा वायदा दर ४०१ रुपयांनी वाढून ६७९२५ रुपये प्रति किलोवर व्यापार करत आहे. स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत औंस २५.९० डॉलर होती.

  गेल्या एका आठवड्यात सोने १,०१५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तथापि, संपूर्ण एप्रिल महिन्यात या दरामध्ये २,६०२ रुपयांची वाढ झाली आहे.

  दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६० हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते. अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पसंती देतात (Gold Silver Price Today ).

  या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत ४ हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याला पाठिंबा मिळाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकन बॉन्ड यील्डच्या सोन्याच्या भावात वाढ झाली असून, सेप-हेवन मालमत्तेला धक्का बसला आहे. मात्र अमेरिकी बाँडच्या उत्पन्नातील कमकुवतपणा आणि अमेरिकन डॉलरच्या नरमपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या.