One India One Gold Rate presented by Malabar Gold and Diamonds

आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या(gold prize fall down) आहेत. चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. आज एमसीएक्सवरील  सोने वायद्यात ०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच ४४,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बाजार बंद झाला आहे. चांदीच्या किमती ०.८ टक्क्यांनी खाली येवून ६२,६१७ रुपयांवर स्थिरावल्या आहेत.

    नवी दिल्ली: देशात लग्नसराईच्या(wedding season) मोसमातही सोन्याचे दर(gold and silver prize today) सातत्याने घसरत आहेत.आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. आज एमसीएक्सवरील  सोने वायद्यात ०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच ४४,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बाजार बंद झाला आहे. चांदीच्या किमती ०.८ टक्क्यांनी खाली येवून ६२,६१७ रुपयांवर स्थिरावल्या आहेत.

    दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर ४४,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले . मिळालेल्या माहितीनुसार हा गेल्या वर्षभरातला सगळ्यात कमी दर आहे. बुधवारी चांदीच्या भावातही घट जाणवली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर ०.८ टक्क्यांनी घसरून ६२,६१७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव २४.०१ डॉलर प्रति औंसवर कायम आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. काल सोन्याचा दर ४४,५३८ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदीचा दर ६३,९८५ रुपये प्रतिकिलो होता.

    सोन्याचे दरात झालेली ही घसरण फार काळ टिकू शकणार नसल्याचे समजते.. डॉलरची किंमतीतील घसरण, महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे तज्ञांचे मत आहे.