गुड न्यूज – सोनं स्वस्त झालंय,जाणून घ्या आजचे दर

मंगळवारी एक्सचेंज उघडल्यानंतर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत ४३ रुपयांनी कमी होत ४९,१०० रुपये प्रति तोळा झाली आहे. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर देखील ४९४०३ रुपयांवर आहेत. चांदीचे दर(Silver Prize Today) देखील कमी झाले आहेत.

  गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होत आहेत. मंगळवारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव (Gold Price Today) उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. मंगळवारी एक्सचेंज उघडल्यानंतर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत ४३ रुपयांनी कमी होत ४९,१०० रुपये प्रति तोळा झाली आहे. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर देखील ४९४०३ रुपयांवर आहेत. चांदीचे दर(Silver Prize Today) देखील कमी झाले आहेत.

  स्थिर ग्लोबर रेट्स असताना भारतात सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. आधीच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घसरणीनंतर ४९,१३१रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर ०.३ टक्क्यांनी कमी होत ७१,६१९ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सध्या ४९५५०-४९७५० या स्तरावर राहतील.

  गेल्या आठवड्यात महागाईच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर पाच महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यावेळी दर साधारण ४९७०० रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. दरम्यान असं असलं तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास ७००० रुपयांनी कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर ५६,२००रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.

  एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीमुळे सोमवारी दिल्लीमध्ये सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. १५२ रुपयांच्या घसरणीनंतर याठिकाणी सोन्याचे दर प्रति तोळा ४८,१०७ रुपयांवर पोहोचले होते. चांदीचे दर देखील ५४० रुपयांनी कमी होऊन ६९,९२५ रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,८८३ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव २७.५५ डॉलर प्रति औंस होता.
  २४ कॅरेट सोन्याचा दर ४,८५१ प्रति ग्रॅम, ३८,८०८ रुपये प्रति ८ ग्रॅम, ४८,५१० रुपये प्रति तोळा आणि ४,८५,१०० रुपये प्रति १०० ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,५१०आहे. तर आजचा चांदीचा भाव प्रति किलो ७१,००० रुपये आहे.

  दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३०० रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५१० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,५१० रुपये प्रति तोळा आहे.